Top News देश

‘….तोपर्यंत नव्या वर्षांचं सेलिब्रेशन नाही’; आंदोलक शेतकरी आक्रमक

नवी दिल्ली | केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी गेल्या महिनाभरापासून आंदोलन करत आहेत. या आंदोलनादरम्यान उद्या नव वर्ष सुरू होईल. मात्र मागण्यांवर काही ठाम असा निर्णय सरकारकडून घेण्यात आला नाही. याच पार्श्वभूमीवर शेतकरी आक्रमक झाले आहेत.

सरकार जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य करत नाही तोवर नव्या वर्षाचं सेलिब्रेशन करणार नाही, असं शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं व्यवस्थापन करणारे हरजिंदर सिंग यांनी म्हटलं आहे.

सरकारने मान्य केलेल्या दोन्ही मागण्या हे काही कायदे नाहीत त्यांचा परिणाम अजून जाणवलेला नाही. आमच्या मागण्या आम्ही स्पष्टपणे सरकारसमोर मांडल्या आहेत. त्यावर सरकार त्यांच्या आवडीनुसार त्या निवडू शकत नसल्याचं होशियारपूर येथील शेतकरी हरेश सिंह यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आज देशभरात आपापल्या घरी प्रत्येकजण नववर्षाची पार्टी करतील. मात्र आंदोलक शेतकरी आपल्या मागण्यांसाठी कडाक्याच्या थंडीत आपल्या आंदोलना लढा चालू ठेवतील.

थोडक्यात बातम्या-

पीडित मुलीला न्याय देणार का पवार साहेब?’; मेहबूब शेख यांच्या प्रकरणावरून राणेंचा पवरांना सवाल

मॅच फिक्सिंगच्या बंदीनंतर ‘या’ भारतीय खेळाडूची तब्बल 7 वर्षांनंतर संघात निवड!

“आता बघू… बाळासाहेबांचा शब्द महत्वाचा की संभाजी राजेंचा स्वाभिमान की मुख्यमंत्री पदाची खुर्ची

“औरंगाबादचं संभाजीनगर करणं झेपलं नाही पण ‘हिंदुहृदयसम्राट’चे ‘जनाब’ बाळासाहेब ठाकरे यशस्वीपणे केलं”

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे कोरोना पॉझिटीव्ह

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या