बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाच्या भीतीने मदतीसाठी कुणीही आलं नाही; पोरांनी बापाचा मृतदेह हातगाडीवरून स्मशानात नेला

लखनऊ | देशातील कोरोना रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. उत्तर प्रदेशच्या बुंदेलखंडमध्ये कोरोनाचा अक्षरश: कहर सुरू आहे. कोरोनामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच लोकांच्या मनात प्रचंड भीती आहे. त्यामुळे याकाळात कोणाचा मृत्यू झाला तर पार्थिवाला खांदा देण्यासाठी माणसं देखील येत नसल्याचं पहायला मिळतंय.

हमीरपूर जिल्ह्याच्या मुक्तिधाममध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला. मात्र कोरोनाच्या भीतीने मृतदेह स्मशानात नेण्यासाठी कुणीही आलं नाही. या व्यक्तीनं संशयास्पद स्थितीत त्यानं प्राण सोडला. त्यांच्या निधनाची माहिती नातेवाईकांना, शेजाऱ्यांना कळवण्यात आली. मात्र कोणही त्यांच्या मदतीला पुढे आलं नाही. मदतीसाठी कोणीही न आल्याने अखेर मृत व्यक्तीच्या मुलांनी एक हातगाडी मागवली आणि वडिलांचा मृतदेह त्यावर ठेवून स्मशानभूमीत नेला.

काही दिवसांपूर्वी हिमाचल प्रदेशमधील रानीतालमध्ये अशीच घटना घडली होती. विरसिंह या तरूणाच्या आईचा कोरोनाने मृत्यु झाला. विरसिंहची आई गावची माजी सरपंच होती. कोरोना झाल्यावर उपचाराआधीच विरसिंहच्या आईचं कोरोनाने निधन झालं. यानंतर मृतदेह नेण्यासाठी कोणीही मदतीसाठी पुढं आलं नाही. त्यामुळे शेवटी मृतदेह आपल्या खांद्यावर उचलून घेत अंत्यसंस्काराचं काम विरसिंहने केलं.

कोरोना काळात अनेक मनाला चटका लावणाऱ्या घटना समोर आल्या आहेत. कोरोना काळात काही ठिकाणी माणुसकीचं दर्शन होत आहे तर काही ठिकाणी माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना समोर आल्या आहेत.

थोडक्यात बातम्या- 

‘गुणरत्न सदावर्ते नीट बोल, आमच्यात माज काढण्याची ताकद आहे’; संयमी विनोद पाटील भडकले

WHO प्रमुखांच्या ‘या’ वक्तव्यानं जगाचं टेन्शन वाढलं, दिला हा गंभीर इशारा

‘कुठून हे नग मिळतात?’; ‘या’ भाजप नेत्यावर जितेंद्र आव्हाडांची बोचरी टीका

आनंदाची बातमी! राज्यात आज नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रूग्णांची संख्या जास्त, 53 हजारांपेक्षा रूग्ण परतले घरी

‘या’ राज्यात लॉकडाऊनच्या सकारात्मक प्रभावामुळे सरकारने आणखी लॉकडाऊन वाढवला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More