टोपी घातली म्हणून कोणी नेताजी बनत नाही; शोभा डे यांचे मोदींवर टीकास्त्र

नवी दिल्ली | आझाद हिंद सेनेची टोपी घातली म्हणून कोणी नेताजी बनत नाही, अशा शब्दात लेखिका शोभा डे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. त्यांनी आपल्या ट्वीटरवरून ही प्रतिक्रिया दिली आहे.

रविवारी लाल किल्ल्यावर एक कार्यक्रम झाला. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आझाद हिंद सेनेची टोपी परिधान केली होती. त्यावर शोभा डे यांनी वरिल प्रतिक्रिया दिली आहे.

शोभा डे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर नेटकऱ्यांनी त्याच्यावर जोरदार टीका केली. गांधीजींची टोपी परिधान करुन गांधी होता येते का? नेहरुंचं जॅकेट परिधान करुन नेहरु होता येते का? शोभा डे या काँग्रेसच्या प्रवक्त्या आहेत, अशी टीका काही युजर्सनी केली.

दरम्यान, आझाद हिंद सेनेच्या स्थापनेला 75 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त लाल किल्यावर मोदींच्या ध्वजारोहण करण्यात आले होते. यावेळी मोदींनी गांधी घराण्यावर टीका केली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

-…तर सरपंचही खासदारापेक्षा वरचढ ठरेल- संजय राऊत

-लोकसभेसाठी भाजप ‘या’ दोन दिग्गज क्रिकेटपटूंना मैदानात उतरवणार?

-#MeToo मोहिमेनंतर आता #MenToo; पुरुषही अत्याचाराला वाचा फोडणार

-राष्ट्रवादीच्या बैठकीत चक्क बसण्याच्या जागेवरून राडा; पहा नक्की काय घडलं…

-अभिनेत्री मेघा धाडे पुन्हा एकदा ‘बिग बॉस’च्या घरात