“जोपर्यंत आमच्या रक्तात छत्रपती आहे तोपर्यंत आम्हाला कोणी गुलाम करू शकत नाही”
ठाणे | आज संपूर्ण राज्यभर आणि देशभर शिवजयंती उत्सव जोमानं साजरा केला जात आहे. राज्यभर शिवजयंती निमित्तानं कार्यक्रम पार पडत असलेले पहायला मिळत आहे. अशातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाला हजेरी लावली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. जोपर्यंत आमच्या रक्तात छत्रपती आहेत आम्हाला कोणी गुलाम करू शकत नाही. जोपर्यंत आमच्या विचारात छत्रपती आहेत, तोपर्यंत आमचे विचार कोणी थांबवू शकत नाही. जोपर्यंत आमच्या कृतीमध्ये छत्रपतींचं समर्पण आहे, तोपर्यंत आम्ही अन्याय करू शकत नाही. सध्या फडणवीसांनी केलेल्या या भाषणाची जोरदार चर्चा होत आहे.
फडणवीस यांनी या भाषणाचा व्हिडीओही आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. पुढे ते म्हणाले की, शिवजयंती ही छत्रपतींना आठवण्यासाठी नाही तर त्यांच्या मार्गाने चालण्यासाठी आहे. म्हणून मी खरोखर या ठिकाणी सकल मराठा समाजाचं मनापासून अभिनंदन करतो की हा कार्यक्रम आयोजित केला.
दरम्यान, राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी भव्य नजारे उभारण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या सगळीकडे शिवमय वातावरण झाल्याचं पहायला मिळत आहे.
थोडक्यात बातम्या –
“…पण आज शिवसेनेचे पक्षप्रमुखच मराठी माणसाच्या मुळावर उठलेत”
कोरोना संसर्ग जास्त काळ राहिल्यास ‘या’ गोष्टीवर होऊ शकतो गंभीर परिणाम
‘तू कोणाची सुपारी घेऊन आलाय का?’, भर भाषणात अजित पवार संतापले
“फुकट वडापाव खाणाऱ्यांनो तुमची शहर सांभाळण्याची औकात नाही”
Petrol Diesel Price | पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, जाणून घ्या आजचे ताजे दर
Comments are closed.