बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

”जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’ शब्द कोणी खेचू शकत नाही’; पंकजा मुंडेंचा फडणवीसांना टोला

औरंगाबाद | विधानसेभेच्या निवडणुकीवेळी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा ‘मी पुन्हा येईल’ हा नारा चांगलाच गाजला होता. या निवडणुकीत सर्वात जास्त जागा येऊन सुद्धा भाजपाला राज्यात सत्ता मिळवता आली नाही. याची खंत वेळोवेळी भाजप नेत्यांनी बोलून दाखवली आहे. अशातच देवेंद्र फडणवीस यांनी ‘आजही मुख्यमंत्री असल्याचं वाटतंय’ असं म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

जनतेने मला भरभरून प्रेम दिलंय. तुमच्यासारख्या नेत्यांमुळे आणि कार्यकर्त्यांमुळे मला जाणवलं नाही की मी आज मुख्यमंत्री नाही. मला आजही वाटतं की मी मुख्यमंत्रीच आहे. तुम्ही मला त्याची कमतरता जाणवू दिली नाही, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्यावरून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे.

‘ही चांगलीच गोष्टी आहे की, त्यांना आजही मुख्यमंत्री असल्याचं वाटतंय. मात्र, जनतेच्या मनातील मुख्यमंत्री हा शब्द कोणी खेचू शकत नाही’, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. आज औरंगाबादमध्ये ओबीसी मेळाव्यात पंकजा मुंडे उपस्थित होत्या त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

दरम्यान, ओबीसी आरक्षण दिलं नाही तर आम्ही आरक्षणासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करू. केंद्राने इंपेरिकल डाटा दिला नाही तर राज्य सरकार का अडकून पडलंय? राज्य सरकारने त्यांची भूमिका घेयला हवी, असंही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या आहेत.

थोडक्यात बातम्या-

3 सेकंदात हत्या, 24 तासात गुन्हेगार जेरबंद; थरकाप उडवणारी घटना

बाॅलिवूडमध्ये घराणेशाहीपेक्षा ‘वर्णभेद’ ही मोठी समस्या – नवाजुद्दीन सिद्दीकी

झुनझुनवालांसाठी ‘हा’ शेअर ठरला मल्टिबॅगर, 3 दिवसात कमावले 310 कोटी

“तुम्ही ज्या मुख्यमंत्र्याची जात काढली, त्याच मुख्यमंत्र्याने मराठा आरक्षण दिलं”

नात्याला काळिमा फासणारी घटना, सख्ख्या दिराकडून वहिनीवर वारंवार बलात्कार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More