महाराष्ट्र मुंबई

मराठ्यांच्या संतापाची लाट आता कोणीही रोखू शकत नाही- उद्धव ठाकरे

मुुंबई | गोदावरीतील जलसमाधीचे पाणी संतापाची लाट बनून मुख्यमंत्र्यांच्या अंगावर उसळले आहे. ही संतापाची लाट साम, दाम, दंड, भेद नीतीनेही रोखता येणार नाही, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. 

सरकार म्हणते न्यायालयीन प्रक्रियेमुळे ते आता निर्णय घेऊ शकत नाही. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, हे खरे असले तरी न्यायालयाची ढाल सरकार किती वेळा पुढे करणार आहे?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. 

दरम्यान, मराठा क्रांतीसाठी पहिले बलिदान शेवटी एका शिवसैनिकानेच दिले. हे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही पण असे पाऊल आता कोणी उचलू नये, असंही त्यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणं म्हणजे पळपुटेपणा!

-मराठा समाजाबद्दल कसल्याही प्रकारचं बेजबाबदार वक्तव्य केलेलं नाही!

-मराठा आक्रमक; ठाण्यात रस्तारोकोसाठी रोडवर टायर पेटवले

-मराठा समाजाच्या असंतोषाला देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील जबाबदार!

-लोक सूर्याजी पिसाळ म्हणून हिणवत आहेत; भाजप जिल्हा उपाध्यक्षाचा राजीनामा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या