मुंबई | बॉलिवूड उत्तर प्रदेशात हलविण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. 2 डिसेंबर रोजी ते मुंबईत त्यासंदर्भातील बोलणी करण्यासाठी येणार आहेत. त्यावर प्रसारमाध्यमांनी विचारले असता चंद्रकांत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
‘मुंबईतून बॉलिवूड कोणीही नेऊ शकत नाही. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे बॉलिवूडप्रमाणे एखादा उद्योग त्यांच्या राज्यात सुरु करावा याच्या अभ्यासासाठी येत असावेत, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
‘ते मुंबईतून बॉलिवूड नेऊ शकत नाही. तसेच मुंबईतील सुविधा इतर ठिकाणी मिळणं फार अवघड आहे पण सुविधा उपलब्ध करुन एखादी पर्यायी सुविधा उपलब्ध केली तर काही आक्षेप असण्याचं कारण नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, बॉलिवूड किंवा असा कोणताही उद्योग ज्यामुळे महाराष्ट्रात रोजगार निर्माण होतो, तो कुठेही नेण्याचे कारण नसल्याचंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
“कितीही प्रयत्न केले तरी बॉलिवूड वेगळं केलं जाणार नाही”
लहानपणी माझंही लैंगिक शोषण झालं; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याचा धक्कादायक दावा
“हजारो कुटुंबांच्या जीवनात आनंदवन फुलवणाऱ्या आमटे कुटुंबातच हे अघटित का घडावं?”
शीतल आमटेंच्या आत्महत्येनंतर आमटे कुटुंबाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची अहमदनगरमध्ये हत्या
Comments are closed.