बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मला पक्षातून काढण्याची कोणाचीही हिंमत नाही, ही केवळ राजकीय लढाई”

पटना | बिहारमधील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून अनेक चढउतार होताना दिसत आहे. बिहारच्या राजकारणात मुख्य पक्ष असलेल्या आरजेडीमध्ये वाद निर्माण झाल्याचं पहायला मिळालं. आरजेडी नेता तेज प्रताप यादव आणि लहान भाऊ तेजस्वी यादव यांच्यात वाद असल्याचं प्रकर्षाने समोर येत आहे. त्यातच आता तेज प्रताप यादव यांनी आरजेडी नेत्यांना खुलं आव्हान दिलं आहे.

तेजस्वी यादव आणि माझ्यात कोणताही वाद नाही, ही केवळ राजकीय लढाई आहे, असं तेज प्रताप यादवने म्हटलं आहे. माझा कोणाशीही वाद नाही. माझा वाद केवळ नितीशकुमार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याशी आहे. कुटुंब एक वेगळी जागा आहे आणि राजकीय लढा हे स्वतःचं वेगळं स्थान असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं.

मी जयप्रकाश नारायण यांचा अनुयाई आणि कृष्णाचा भक्त आहे. मला पक्षातून काढण्याची कोणाची हिंमत नाही, असं तेज प्रताप म्हणाले. जयप्रकाश नारायण यांचे अनुयायी आणि कृष्णाचे भक्त असलेल्यांना पक्षातून कोण बाहेर काढू शकतो?, असा सवाल देखील तेज प्रताप यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून आरजेडी पक्षातील अंतर्गत वाद चव्हाटावर येताना दिसत आहे. पक्षातील ज्येष्ठ नेते शिवानंद तिवारी आणि तेज प्रताप यांच्यात शाब्दिक खडाजंगी दिसून येतं होती. मात्र आता तेजस्वी यादव यावर कोणतं पाऊल उचलणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या-

यंदाचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार ‘या’ तीन अर्थशास्त्रज्ञांना जाहीर!

सोनं-चांदी खरेदी करण्याआधी इथे तपासा लेटेस्ट भाव एका क्लिकवर

लखीमपूर प्रकरणात आशिष मिश्राला न्यायालयाने दिली ‘इतक्या’ दिवसांची पोलीस कोठडी

“देवेंद्र फडणवीसांना बोलण्याचा अधिकार नाही; रामराज्याच्या नावाखाली तालिबानी राजवट सुरू आहे”

“आजचा ‘महाराष्ट्र बंद’ यशस्वी, हा आघाडी सरकारचा बंद नाही तर…”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More