Top News देश

रेल्वेत एकाही प्रवाशाचा अन्न-पाण्यावाचून मृत्यू झालेला नाही; रेल्वेमंत्र्यांचा दावा

मुंबई | लॉकडाऊनमध्ये लाखो कामगार देशातल्या विविध भागात अडकून पडले. त्यांना आपापल्या गावी पोहचवण्यासाठी केंद्र सरकारने श्रमिक ट्रेनची व्यवस्था केली याच दरम्यान रेल्वेमध्ये अन्न आणि पाणी न मिळाल्यानं अनेक मजुरांचा मृत्यू झाल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. याच आरोपाला उत्तर देताना रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी एकाही प्रवाशाचा अन्न पाण्यावाचून मृत्यू झालेला नाही, असा दावा केला आहे.

देशात कोणत्याही रेल्वेगाडीला पोहोचण्यासाठी 7 किंवा 9 दिवस लागलेले नाहीत. त्याचबरोबर एकाही प्रवाशाचा मृत्यू जेवण अथवा पाणी न मिळाल्यान झालेला नाही. रेल्वे प्रवाशांना 1. 9 कोटी रूपयांपेक्षा अधिक जेवण व 1. 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त पाण्याच्या बॉटल रेल्वेद्वारे पुरवण्यात आले, असा खुलासा रेल्वेमंत्र्यांनी केला आहे.

रेल्वे मार्गातील अडथळ्यांमुळे काही रेल्वेगाड्या वळवण्यात आल्या. ज्याचं प्रमाण एकूण रेल्वेगाड्यांच्या तुलनेत 1.75 टक्के इतकंच आहे.  रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी रेल्वेसंदर्भात करण्यात आलेल्या सगळ्या आरोपांना ट्विट करून उत्तरं दिली आहेत.

दरम्यान. श्रमिक रेल्वेगाड्यांमध्ये 10 दिवसांत 80 मजुर-कामगारांचा मृत्यू झाला आहे, असा आरोप एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केला आहे. तसंच न्यायालयाने देखईल मजुर प्रश्नी लक्ष लाघत सरकारची कानउघाडणी केली होती.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

राज्यात 2361 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, पाहा तुमच्या भागातील कोरोना रुग्णांचा तपशील

कोरोनाचा पुण्याला दिलासा, मात्र मुंबईत आज धक्कादायक आकडा

गुडन्यूज! पुण्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट, आज सापडले फक्त एवढे रुग्ण

महत्वाच्या बातम्या-

कोरोनाविरोधी लढ्यात केरळची महाराष्ट्राला मोलाची मदत, मुख्यमंत्री-आरोग्यमंत्र्यांनी मानले आभार

कोरोनाच्या संकटकाळात 30 हजार दिव्यांगांसाठी मुंबई महापालिकेचं मोठं पाऊल

‘हरिओम’ ऐवजी ‘हे राम’ म्हणावे लागेल अशी वेळ लोकांनी आणू नये- संजय राऊत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या