Top News महाराष्ट्र मुंबई

राजकारणात कुणीही कायमचा शत्रू नसतो, संजय राऊतांचा भाजपला तिळगूळ!

मुंबई | मी भाजपला विरोधी पक्षच मानत नाही, ते आमचे सहकारीच आहेत. मुळात राजकारणात कुणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळं राजकीय वर्तुळात आच्छर्य व्यक्त केलं जातय.

गुरुवारी मुंबईत संजय राऊत प्रसार माध्यमांशी बोलत होते त्यावेळी पत्रकारांनी त्यांना तुम्ही विरोधी पक्षाला मकरसंक्रांतीच्या काय शुभेच्छा द्याल, असा प्रश्न विचारण्यात केला. त्यावर त्यांनी ते वक्तव्य केलं आहे.

संजय राऊत म्हणाले की, “राजकारणात कुणीही कायमचा शत्रू आणि मित्र नसतो. भाजपा सोबत आम्ही पंचवीस वर्ष काम केले आहे. आम्ही त्यांना शत्रू मानायला तयार नाही. जरी विरोधी पक्षात असले तरी ते आमचेच सहकारी आहे.”

तसंच, मकरसंक्रांतींच्या दिवशी मी एवढीच अपेक्षा करतो की, विरोधी पक्षातील सहकाऱ्यांनी आमच्याशी गोड बोलावं, गोड राहावं, गोड हसावं. त्यांनी सरकारबाबात सकारात्मक विचार करावा, एवढ्याच शुभेच्छा आहेत, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

क्रिकेटची हत्या केली म्हणणाऱ्या भाजप खासदाराला हनुमा विहारीचा रिप्लाय, सेहवागला हसू आवरेना

एनसीबीने जावयाच्या घरी धाड टाकल्यानंतर नवाब मलिकांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…

संकटं येतच राहतात मात्र सत्याचा पराभव कधीच होत नाही- रेणू शर्मा

महिलेसोबत नको त्या गोष्टीवर चर्चा; तीन यूट्यूबर्सना पोलिसांकडून अटक

Freedom 251 मोबाईल आठवतो का?, त्याच्या मालकाला नव्या घोटाळ्यात अटक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या