कझाकिस्तान | आतापर्यंत एकाही पंतप्रधानांना जे जमलं नाही ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून दाखवले आहे, असं परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी म्हटलं आहे. त्या कझाकिस्तानमध्ये भारतीय जनसमुदायाशी बोलत होत्या.
मोदी सरकारने अनिवासी भारतीयांविषयी जी आस्था दाखवली, ती यापुर्वी कधीच दिसली नाही. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून ते डॉ. मनमोहन सिंग यांच्यापर्यंत कोणत्याही भारतीय पंतप्रधानांनी अनिवासी भारतीयांसाठी सभा घेतल्या नाहीत, असं त्यांनी म्हटलं.
दरम्यान, अनिवासी भारतीय दूतावासांसाठी ‘होम अवे फ्रॉम होम’ हे उद्दिष्ट ठरवलं असल्याचंही स्वराज यांनी यावेळी सांगितलं.