देश

मुस्लीम व्यक्तीकडून भाजी खरेदी करु नका; भाजप आमदाराचं वक्तव्य

नवी दिल्ली | कोरोनोचा वाढत्या फैलावामुळे देशात लॉकडाऊनच्या सूचना देण्यात आल्या. कोरोनाच्या लढाईत पोलीस आणि डॉक्टर्स, नर्स, वैद्यकीय अधिकारी शुर शिपायासारखे लढत आहे. प्रशासनाकडूनही नागरिकांनी घरात राहण्याचं आवाहन केलं जात आहे. मात्र उत्तर प्रदेशातील भाजप आमदार सुरेश तिवारी यांनी मुस्लीम व्यक्तीकडून भाजी खरेदी करु नका असं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, मी सर्वांना खुलेआम सांगतो आहे. मुस्लीम व्यक्तीकडून कोणीही भाजीपाला खरेदी करु नका, असं वक्तव्य सुरेश तिवारी यांनी केलं आहे. तिवारी यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  इंडियन एक्स्प्रेसने या व्हिडीओसंदर्भात तिवारी यांनी बाजू घेण्याचा प्रयत्न केला आहे.

हे वक्तव्य मी गेल्या आठवड्यात केलं होतं. माझ्याकडे काही लोकांनी तक्रारी केल्या होत्या की काही भाजीवाले हे आपल्या मालावर थुंकी लावून तो विकत आहेत. सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता मी लोकांना त्यांच्याकडून भाजी विकत घेऊ नका म्हणून असं म्हणत तिवारी यांनी आपली बाजू मांडली होती.

दरम्यान, राज्य भाजप प्रवक्त्यांनी मात्र सुरेश तिवारी यांनी केलेलं वक्तव्य हे वैय्यक्तिक असून ती पक्षाची भूमिका नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

मुख्यमंत्र्यांकडे महाराष्ट्र मोठा भाऊ म्हणून पाहतोय- सुप्रिया सुळे

अर्थकारण महापालिकेतल्या टक्केवारी इतके सोप्प नाही; शिवसेनेच्या टीकेला भाजप आमदाराकडून प्रत्युत्तर

महत्वाच्या बातम्या-

वक्त्या आणि सामाजिक कार्यकर्त्या अपर्णा रामतीर्थकर यांचं निधन

बंदुक द्या पोलीसांना! काठ्या माणसांसाठी असतात यांच्यासाठी तर … – हेमंत ढोमे

लुडोत हरवल्याने रागाच्याभरात नवऱ्याने मोडला बायकोच्या पाठीचा कणा !

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या