बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘कोणीही अतिशहाणपणा शिकवू नये’; संजय राऊतांचा राणेंवर हल्लाबोल

मुंबई | सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक निवडणुकीतील प्रचार प्रमुख शिवसेना कार्यकर्ते संतोष परब (santosh parab) हल्याप्रकरणी आमदार नितेश राणेंवर (Nitesh Rane) आरोप करण्यात आले आहेत. याप्रकरणी नितेश राणेंवर सध्या अटकेची टांगती तलवार आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ पहायला मिळत आहे.

नितेश राणेनंतर आता केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या अडचणींत वाढ झाली आहे. नारायण राणेंना कणकवली पोलिसांकडून चौकशीला हजर राहण्याबाबत नोटीस बजावण्यात आली होती. नितेश राणे हे नॉट रिचेबल असल्याने पोलिसांनी आता नारायण राणे यांना कणकवली पोलिसांनी नोटीस बजावली. आता यावरुन संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्र सरकार हे कायद्याप्रमाणे काम करत आहे, कोणीही अतिशहाणपणा शिकवू नये असं म्हणत संजय राऊत यांनी राणेंना सुनावलं आहे.

पोलिसांपासून महत्त्वाची माहिती लपवली जाऊ नये, पोलिसांना एखादी व्यक्ती गुन्ह्यासंदर्भात हवी असेल, तो आपला पुत्र असेल, मित्र असेल, त्याची माहिती पोलिसांना देणं गरजेचं आहे. गुन्हेगारांना पाठिशी घालण्यासंदर्भात तुमच्यावरही गुन्हा दाखल होऊ शकतो, असा टोला संजय राऊत यांनी राणेंना लगावला आहे.

थोडक्यात बातम्या – 

‘…तर ही तिसऱ्या लाटेची सुरुवात असू शकते’; आदित्य ठाकरेंचा सूचक इशारा

लेकाच्या पाठोपाठ आता बापही अडचणीत, नारायण राणेंना पोलिसांकडून नोटीस

‘राजकारणाच्या हमाम मे सब नंगे है’; संजय राऊतांचा हल्लाबोल

Corona: राष्ट्रवादी काॅंग्रेस खासदार सुप्रिया सुळे यांना कोरोनाची लागण

‘…पण केंद्राचा त्यांच्यावर दबाव आहे’; संजय राऊतांचा राज्यपालांना खोचक टोला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More