बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कुणी कितीही आपटा संजय काकडे सापडणार नाही”

पुणे | कुख्यात गुंड गजा मारणे रॅली प्रकरणात माजी खासदार संजय काकडे यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. गजा मारणेच्या मिरवणुकीत संजय काकडे यांच्या गाड्या असल्याच्या माहितीवरुन पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती होती.

दुपारी संजय काकडे यांना कोर्टात हजर केलं गेलं. त्यानंतर शिवाजीनगर सत्र न्यायालयानं संजय काकडे यांना 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला गेला आहे.  जामीन मिळाल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली.

कुणी कितीही आपटा संजय काकडे सापडणार नाही, असं न्यायालयातून जामीन मिळाल्यावर संजय काकडे म्हणाले. तर यावेळी बोलताना त्यांनी राजकारण केलं जात असल्याचा आरोप केला. पालिकेच्या निवडणूका डोळ्यासमोर आल्यानं हे राजकारण केलं जात असल्याचं काकडे यांनी सांगितलं.

दरम्यान, गजा मारणे याने 300 गाड्यांसह मुंबई पुणे महामार्गावर रॅली काढत धुडगूस घातला होता. ही रॅली काढण्याच्या प्लॅनिंगमध्ये सहभाग घेऊन गुन्हेगारांना मदत केल्याचा आरोप काकडेंवर आहे. त्यांच्यावर बंडगार्डन पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला होता. फरार असलेला गजा मारणे पोलिसांना जास्त दिवस गुंगारा देऊ शकला नाही. सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात मेढा गावमध्ये गजा मारणेला पोलिसांनी अटक करत बेड्या ठोकल्या होत्या.

थोडक्यात बातम्या- 

“नाशिक महापालिका आयुक्तांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा”

“आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आहे पण…”, नाशिकमध्ये घडलेल्या घटनेवरून राज ठाकरे आक्रमक

नाशिकमधील ऑक्सिजन गळतीच्या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिक्रया; म्हणाले…

“मम्मी बरी झालेली, पण ॲाक्सिजन संपला अन् फडफड कोंबडीवाणी मेली ती”

…म्हणून पोलीस अधिकाऱ्याने स्वतःच्याच पत्नीवर झाडली गोळी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More