बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“माझ्याशिवाय आणीबाणी कोणालाच कळणार नाही”

मुंबई | बाॅलिवूडची पंगा क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री कंगना रणौत नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असलेली पहायला मिळते. ती नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेचा विषय बनत असते. यातच आता कंगणाने आणीबाणी बद्दल वक्तव्य केल्यानं ती पुन्हा चर्चेत आली आहे.

माझ्याशिवाय आणीबाणीचा काळ कोणाला कळू शकत नाही, माझ्याशिवाय आणीबाणी उत्तमरित्या कोणीच दिग्दर्शित करू शकणार नाही, असं अभिनेत्री कंगणा रणौतनं म्हटलं आहे. भारतात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांंनी आणीबाणी लागू केली होती. त्याला आज 46 वर्ष पुर्ण होत आहेत. त्यामुळे भाजपने हा मुद्दा पुन्हा उचलून धरला आहे आणि काँग्रेसवर टीका केली आहे. ट्विटरवर सध्या #DarkDaysOfEmergency हा हॅशटँग सूरू आहे.

कंगणा रणौत लवकरच भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत झळकणार आहे. ती इंदिरा गांधी यांच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे. अलीकडेच या चित्रपटाविषयी बोलताना कंगनाने सांगितलं की, ती लवकरच इंदिरा गांधीच्या भूमिकेत दिसणार आहे. कंगणाचा भाजपच्या बाजूने झुकता कौल असल्यानं इंदिरा गांधींबद्दलच्या चित्रणाने वाद उद्भवण्याची शक्यता आहे.

दरम्यान, हा चित्रपट पाहणं माझ्या पिढीला सध्याची भारताची सामाजिक-राजकीय परिस्थिती समजण्यास सुलभ करेल, असंही कंगणानं म्हटलंय. आता कंगणानं तिच्या सोशल मीडियावरही चित्रपटाची एक छोटीशी झलक दाखवली आहे. या चित्रपटात अनेक प्रसिद्ध कलाकारांचा सहभाग असणार असून भारतीय राजकारणातील एका प्रतिष्ठित नेत्याची भूमिका साकारण्यासाठी मी उत्सुक आहे, असं तिनं म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

अनिल देशमुखांच्या घरावर ईडीचे छापे, सुप्रिया सुळे संतापल्या, भाजपवर गंभीर आरोप

…यामुळे अनेक मराठा मुख्यमंत्री झाले पण त्यांनी मराठा आरक्षण दिलं नाही- सदाभाऊ खोत

मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरी ईडीची छापेमारी

‘दिल्ली और दिल की दूरी खत्म करना चाहता हूं’; काश्मिरी नेत्यांच्या बैठकीत मोदींचं शायरीतून सूतोवाच

“गुलाबराव पाटील हे मला वडिलांसारखे, मुलीने चांगलं काम केलं म्हणून प्रोत्साहन द्यायला हवं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More