बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“देशात भाजपसोबत स्पर्धा करण्याची क्षमता कोणत्याच पक्षात नाही”

लखनऊ | उत्तर प्रदेश विधानसभेच्या पुढील वर्षी निवडणुका आल्या आहेत. सर्व पक्ष आपली ताकद पणाला लावत निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र सिंह देव यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

देशात भाजप पक्ष धर्म, पंत आणि जातीचा विचार न करता प्रत्येक नागरिकाच्या कल्याणासाठी काम करतो. तसेच भाजपची स्पर्धा करण्याची क्षमता कोणत्याच पक्षात नाही. देशात आमच्यासोबत फक्त तोच पक्ष स्पर्धा करू शकतो, जो घराणेशाही, जातीवाद आणि धर्माचे राजकारण करत नाही. आमचा पक्ष फक्त उत्तर प्रदेशच्या विकासासाठी आणि तरूणांच्या कल्याणासाठी काम करतो, असं देव यांनी म्हटलं आहे.

मायावतींच्या बहुजन समाज पक्षाला कमकुवत पक्ष समजून चालणार नाही. पुढील वर्षीच्या निवडणुकीत बहुजन समाज पक्ष हा समाजवादी पक्षापेक्षा मजबुत होणार आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी काही दिवसांपुर्वी त्यांचा पक्ष 400 जिंकणार आहे, असा दावा केला होता. यादव यांच्या दाव्याबद्दल विचारलं असता देव हसत म्हणाले की, 400 जागा कुठून मिळतील.

दरम्यान, उत्तर प्रदेशच्या आगामी वर्षी निवडणुका होऊ घातल्याने सर्वच पक्ष सत्ता मिळवण्यासाठी जोरदार तयारीत लागले आहेत. देशात भाजपने 2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर घोडदौड करत केंद्रासह अनेक राज्यात सत्ता प्रस्थापित केली आहे. आता पुढच्या निुवडणुकीसाठी भाजप तयारी करताना दिसत आहे.

थोडक्यात बातम्या –

उद्धव ठाकरेंची लोकप्रियता ही ममता बॅनर्जी आणि स्टॅलिन यांच्या तोडीची- जावेद अख्तर

पिल्लाचा मृतदेह सोंडेत घेऊन फिरताना दिसली हत्तीण, डोळ्यात पाणी आणणारा व्हिडीओ व्हायरल

“तुम्ही गाणं म्हटलं की कलाकार आणि लोककलावंतानी म्हटलं की नाचे”

उदयनराजे भोसलेंचा शिवेंद्रसिंहराजेंना टोला, म्हणाले…

देवेंद्र फडणवीसांनी ‘ते’ परिपत्रक काढलं म्हणून ओबीसी आरक्षण धोक्यात आलं- नाना पटोले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More