Top News कोरोना मुंबई

मुंबईत नवीन वर्षाची गच्चीवरही ‘नो पार्टी’; देखरेखीसाठी 35 हजार पोलीस तैनात

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रात्रीच्या वेळस संचारबंदी जारी केलीये. दरम्यान नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकरांची तयारी सुरु असेल मात्र कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलीस देखील सतर्क असणार आहेत.

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबईत 35 हजार पोलिसांचा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. तैनात करण्यात आलेल्या पोलिसांचं सर्वांवर बारकाईने लक्ष असणार आहे.

पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या माहितीनुसार, कोरोनाच्या नियमांचं पालन काटेकोर पद्धतीने होतंय का यावर पोलिसांचं बारीक लक्ष असेल. नाइट कर्फ्यूच्या आदेशानुसार, 5 पेक्षा जास्त लोकांच्या एकत्र येण्यावर बंदी आहे. मात्र, लोकं त्यांच्या कुटुंबासोबत बाहेर पडले आणि 4 किंवा त्यापेक्षा कमी जण असतील, तर काही अडचण नाहीये.”

बोटीवर तसंच ईमारतीच्या गच्चीवर देखील पार्ट्यांना परवानगी नाहीये. नियमांचं उल्लंघन केल्यास आयोजक तसंच गर्दीवर कारवाई करण्यात येईल, असं नांगरे पाटील यांनी सांगितलंय.

थोडक्यात बातम्या-

सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या की हत्या; सीबीआयने स्पष्ट करावं- अनिल देशमुख

गॅस दर कमी केले नाही तर….; रूपाली चाकणकर आक्रमक

‘बॉक्सिंग डे टेस्ट’ म्हणजे काय?; जाणून घ्या या नावामागील कारण…

अजिंक्य रहाणेच्या झुंजार फलंदाजीसमोर कांगारू बेजार; पहिल्या डावात भारताकडे आघाडी

“भारत भालकेंच्या जागेवर पार्थ पवार यांना संधी द्या”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या