Top News महाराष्ट्र मुंबई

सर्व सामान्यांच्या रेल्वे प्रवासात राजकारण करू नका; गृहमंत्र्यांचे आवाहन

मुंबई |  कोरोना संसर्ग रोगामुळे गेले सात-आठ महिने मुंबईती रेल्वे बंद आहे. राज्य सरकारने मुंबईती रेल्वे सुरु करण्याबाबत प्रस्ताव दिला आहे. रेल्वे प्रशासनाने यावर राजकारण न करता सर्वसामान्यांसाठी रेल्वे सुरु करण्याचे सहकार्य करावे, असं आवाहन महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे.

अनिल देशमुख म्हणाले की, “ज्याला मुंबई शहराची ‘लाईफलाईन’ म्हणतात ती लोकल ट्रेन सुरु करण्याबाबतचा प्रस्ताव दिला आहे”. तसेच यावर प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याची गरज असल्याचेही देशमुख म्हणाले आहेत.

निवडक गटात प्रवाशांची विभागणी करुन सर्वसाधारण प्रवाशांना ठराविक वेळेत रेल्वेतून प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध करुन द्यावी, अशा सूचना राज्य सरकारने दिल्या आहे.

दरम्यान, कोरोना संसर्गाचा फैलाव होऊ नये यासाठी आठ महिन्यापूर्वी केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांना महामारीला सामोरे जावे लागले होते, आणि आता लॉकडाऊन नसतानाही त्यांना महामारीला तोंड द्यावे लागत आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘मी 3 वर्षांची असताना….’; अभिनेत्री फातिमा सना शेखचा खळबळजनक गौप्यस्फोट

“भाजपमध्ये अनेकजण आले आणि गेले, आपण पक्ष सोडल्याने अनागोंदी माजणार नाही”

“कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी एसटीची मालमत्ता गहाण ठेवणं महाराष्ट्राला शोभत नाही”

“2019 ला हे महाराष्ट्राने बघितलंय आणि आता…”

काँग्रेस नेते कमलनाथ यांना निवडणूक आयोगाचा मोठा झटका!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या