Top News देश

इंधन दरवाढ ; पेट्रोलियम कंपन्यांनी घेतला ‘हा’ निर्णय

नवी दिल्ली | देशभरात डिझेल आणि पेट्रोलच्या दराचा चांगलाच भडका उडाल्याचं पहायला मिळालं. सलग २१ दिवस इंधनदरवाढीच्या दरात वाढ झाल्यानं नागरिकांच्या खिशाला चांगलीच कात्री बसली. मात्र सलग दोन दिवस पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ केली नसल्यानं नागरिकांना यामुळे चांगलाच दिलासा मिळणार आहे.

लॉकडाउन शिथिल होताच पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ करण्यात आली. दिवसागणिक पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्यानं नागरिक या इंधनदरवाढीमुळं चांगलेच त्रस्त झाल्याचं पहायला मिळालं.

दुसरीकडे गेल्या २५ दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किंमती जशाच्या तशा आहेत. त्या प्रतिबॅरल ३५ ते ४० डॉलरच्या दरम्यान आहेत, मात्र देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे.

दरम्यान पेट्रोल दरवाढीचे बरेच राजकीय पडसादही उमटले. सोमवारी इंधनदरवाढीच्या विरोधात देशभरात सर्वत्र आंदोलनं केल्याचं पहायला मिळालं. अखेरीस पेट्रोलियम कंपन्यांनी सलग दोन दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं कळतंय.

ट्रेंडिंग बातम्या-

पुण्यात कोरोनाचं थैमान, जिल्हाधिकाऱ्यांच्या डॉक्टरांना या महत्त्वाच्या सूचना

जोतिबा फुले जनआरोग्य योजनेतून १ लाख २२ हजार कोरोनाबाधितांवर मोफत उपचार, आरोग्यमंत्र्यांचा दावा

महत्वाच्या बातम्या-

‘कोरोना काळात भ्रष्टाचार करण्याची हीच ती वेळ’; मनसेचा शिवसेनेवर हल्लाबोल

पंढरपूरमध्ये महापूजेला मुख्यमंत्र्यांसह दत्ता भरणेंना प्रवेश द्या- अजित पवार

‘काँग्रेसला उत्तरे देण्यापेक्षा चीनला प्रत्युत्तर द्यावं’; शिवसेनेचा मोदींना सल्ला

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या