आईच्या संपत्तीवर कुणाचा अधिकार?; दिल्ली उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

Property Rights Of Children On Mothers Property Delhi High Court Important Judgement 

Property Rights | राज्यात तसेच देशात संपत्तीवरून (Property Rights) मोठ्या प्रमाणात वादविवाद पाहायला मिळतात. संपत्तीवरून होणारे वादविवाद अनेकदा न्यायालयात जातात. संपत्तीच्या कारणावरून मोठ्या प्रमाणात हाणामारीच्या (Fights) घटना सुद्धा घडतात. खरे तर देशात संपत्तीविषयक अनेक कायदे (Laws) आहेत. या कायद्यात वेळोवेळी सुधारणा होत आहेत.

मात्र सर्वसामान्य नागरिकांना संपत्तीविषयक सर्वच कायद्यांची माहिती नसते आणि यामुळे मालमत्तेवरून मोठा गोंधळ होतो, कुटुंबात यावरून वादविवाद सुरू होतात. संपत्तीची प्रकरणे न्यायालयात जातात. दरम्यान अशाच एका संपत्तीच्या प्रकरणात उच्च न्यायालयाने (High Court) नुकताच एक महत्त्वपूर्ण निकाल (Important Judgement) दिला आहे.

खरंतर वडिलांच्या संपत्तीवर (Father’s Property) मुलाचा (Son) आणि मुलीचा (Daughter) समान अधिकार (Equal Rights) असतो. वडिलोपार्जित संपत्तीमध्ये (Ancestral Property) मुलाला आणि मुलीला, अगदीच मुलगी विवाहित (Married) असली तरी देखील, तिला समान वाटा देण्याची तरतूद आहे. जर वडिलांनी स्वतः संपत्ती कमावली असेल तर अशा प्रकरणांमध्ये वडिलांच्या इच्छेनुसारच संपत्तीचे वाटप होते. मात्र जर वडिलांचे निधन इच्छापत्र (Will) न बनवता झाले तर अशा संपत्तीत देखील मुलगा आणि मुलगी वाटेकरी असतात. पण, उच्च न्यायालयाने आईच्या संपत्तीवर (Mother’s Property) मुलाचा आणि मुलीचा अधिकार नसतो, असे म्हणत एक प्रकरण निकाली काढले आहे. या प्रकरणात न्यायालयाने नेमके काय मत नोंदवले, काय निकाल दिला आहे, याबाबत तपशीलवार माहिती पाहुयात.

काय होते प्रकरण? (What was the Case?)

हे प्रकरण आहे दिल्लीमधील (Delhi). राष्ट्रीय राजधानी दिल्लीमधील उत्तर पश्चिम दिल्लीतील (North West Delhi) शास्त्री नगर (Shastri Nagar) येथील एका 85 वर्षीय महिलेने आपल्या मुलीच्या विरोधात आणि जावयाच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात त्यांची मुलगी आणि जावई त्यांच्या संपत्तीवर अनधिकृत ताबा (Unauthorized Possession) मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हणत याचिका (Petition) दाखल केली होती. लाजवंती देवी (Lajwanti Devi) असे या याचिकाकर्त्या महिलेचे नाव आहे. 1985 मध्ये लाजवंती देवी यांनी आपल्या मुलीला आणि जावयाला राहण्यासाठी घराचा काही भाग दिला होता. पण आता मुलीला आणि जावयाला दिलेले घर ते रिकामे करत नाहीयेत. म्हणजेच मुलगी आणि जावई लाजवंती देवी यांच्या संपत्तीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आहे.  (Property Rights)

न्यायालयाचा निर्णय काय?

याविरोधात लाजवंती देवी उच्च न्यायालयात गेल्यात आणि न्यायालयाने आता या प्रकरणात लाजवंती देवी यांच्याच बाजूने निर्णय दिला आहे. खरंतर, लाजवंती देवी यांची ही संपत्ती त्यांच्या पतीने 1966 मध्ये खरेदी केली होती. महत्त्वाचे म्हणजे ही संपत्ती लाजवंती देवी यांच्याच नावाने खरेदी करण्यात आली होती. म्हणून न्यायालयाने आता त्यांच्या पतीच्या निधनानंतर या संपत्तीवरील संपूर्ण अधिकार हा लाजवंती देवी यांचा आहे, असे निरीक्षण नोंदवले आहे. तसेच न्यायालयाने सहा महिन्यात लाजवंती देवी यांचे घर मुलीला आणि जावयाला रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत.

2014 पासून सुरू असणाऱ्या या सुनावणीच्या काळात मुलीला आणि जावयाला प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपये भरणे बंधनकारक करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे संपत्ती सोडण्याच्या दिवसापर्यंत महिन्याला दहा हजार रुपये दंड (Fine) म्हणून भरावे लागणार आहेत. (Property Rights)

थोडक्यात, आईच्या नावावर असलेल्या संपत्तीवर मुलांचा किंवा मुलीचा कोणताही अधिकार नसल्याचा महत्त्वपूर्ण निकाल दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. या निकालामुळे अनेक कायदेशीर पेच सुटण्यास मदत होणार आहे.

Title : No Property Rights Of Children On Mothers Property Delhi High Court Important Judgement 

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .