बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संजय राऊतांना दिलासा नाहीच, ‘या’ तारखेपर्यंत कोठडीतील मुक्काम वाढला

मुंबई | पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीने (ED) अटक केली. संजय राऊतांची न्यायालयीन कोठडी आज संपली. 22 दिवसांपासून तुरूंगात असलेल्या राऊतांना बेल मिळणार की जेल होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं असताना राऊतांना आजही दिलासा मिळाला नाही.

संजय राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत 5 सप्टेंबर पर्यंत वाढ करण्यात आली आहे. पत्राचाळ प्रकरणी राऊतांची चौकशी सुरू असून त्यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी ईडीकडून करण्यात आली होती.

दरम्यान, 30 जुलै रोजी राऊतांना ईडीने अटक केली होती. आजच्या सुनावणीनंतर संजय राऊतांचा आर्थर रोड मध्यवर्ती तुरूंगातील मुक्काम वाढला आहे.

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More