बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिंदे सरकारचा गणेश मंडळांना दिलासा, परवानगी मिळवण्यासाठी ‘ही’ आहे सोपी प्रक्रिया

मुंबई | कोरोना (Corona) महामारी आणि टाळेबंदीमुळे गेली दोन वर्षे सर्वत्र सार्वजनिक सण आणि उत्सवांवर मर्यादा होत्या. पण आता देशावरील कोरोनाचे काळे सावट थोडे कमी झाले आहे. त्यामुळे यंदाचे गणोशोत्सव, गोपाळकाले आणि मोहरम पूर्वीसारखे धुमधडाक्यात साजरे होणार आहेत. प्रशासनाने दोन वर्षांपूर्वीचे सर्व निर्बंध काढले असून, आता गणपती मंडळांना दिलासा मिळाला आहे.

यंदा गणपतींच्या मूर्तींवर कोणतीही उंचीची मर्यादा नसेल. तसेच सर्व गणपती मंडळांना सर्व प्रकारच्या परवानग्या एकाच ठिकाणी प्राप्त व्हाव्यात याकरीता एक खिडकी योजना राबविली जाणार आहे. त्याप्रकारचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिले आहेत. कालच्या (दि. 22) च्या मंत्रीमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ऑनलाईन पद्धतीने सुद्धा या सर्व परवानग्या मिळविता येणार आहेत.

कोणतीही क्लिष्ट नियमावली यावेळी ठेवली जाणार नाही. सर्व सार्वजनिक सणाच्यावेळी कायदा आणि सुव्यवस्था आबाधित राहील, याची उत्तम काळजी घेण्याचे आणि त्या अनुषंगाने व्यवस्था करण्याचे आदेश पोलीस आणि जिल्हा प्रशासनाला दिले गेले आहेत. गणेश चतुर्थी अगोदर राज्यभरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे देखील आदेश दिले आहेत.

दरम्यान, मुंबईतील बेस्टतर्फे सर्व गणपती विसर्जन घाट, तलाव आणि समुद्र किनाऱ्यांवर पुरेश्या वीज पुरवठ्याची सोय करावी असे आदेश प्रशासनाला दिले आहेत. प्लास्टर ऑफ पॅरीस मुर्त्यांबाबात एका तांत्रिक समितीची स्थापना केली जाणार असून, त्यात एमपीसीबी, निरी, आयआयटी, एनसीएल आदी संस्थांचे तज्ज्ञ प्रतिनिधी म्हणून काम पहातील आणि पर्यावरणपूरक मार्ग काढणार आहेत.

थोडक्यात बातम्या – 

नरेंद्र मोदींनी द्रौपदी मुर्मू यांची निवासस्थानी भेट घेत दिल्या शुभेच्छा!

“चित्राताई, उद्या तुम्ही ब्ल्यू फिल्म टाकून, त्यावरही उत्तर मागाल”

“धनुष्यबाण डोहाळे जेवणासाठी भाड्याने देण्याची वेळ आलीये” 

राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्याला ईडीचा झटका!

मोठी बातमी! राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मूंचा विजय

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More