महाराष्ट्र मुंबई

फडणवीस सरकारच्या काळातील विकास प्रकल्पांना स्थगिती नाही- उद्धव ठाकरे

मुंबई | देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातील विकास प्रकल्पांना नवं सरकार स्थगिती देणार नाही. तसेच बुलेट ट्रेनबाबत आढावा घेऊन योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल झालेल्या बैठकीत सांगितलंय. या बैठकीला महाविकासआघाडीचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.

विकास कामाच्या आड आम्ही येणार नाहीत, मात्र स्थानिकांना विचारात घेऊन विकास कामांना प्राधान्य देण्यात येईल. तसेच फडणवीस सरकारच्या काळात सुरु झालेल्या समृध्दी महामार्ग, बुलेट ट्रेन प्रकल्प ही वेळेत पूर्ण केली जातील, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

भीमा कोरेगाव प्रकरणात दाखल करण्यात आलेले गुन्हे जे गंभीर स्वरुपाचे नाहीत ते मागे घेण्याचे आदेश आधीच्या सरकारने दिले होते, त्याची अंमलबजावणी झाली की नाही हे तपासण्यास  मी प्रशासनाला सांगितलं आहे, अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली.

दरम्यान, प्रशासन तळमळीने काम करतं पण कामाची प्रगती आणि वापरण्यात येणारा निधी याचा ताळमेळ घालणं गरजेचं आहे, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या –

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या