बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“20 टक्के लसीकरण झालेल्या देशात कोरोनाची तिसरी लाट नाहीच”

मुंबई | गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभर हाहाकार माजवल्याचं चित्र पाहायला मिळालं. वाढत्या रुग्णसंख्येमुळे देशातील आरोग्य यंत्रणेवरही मोठ्या प्रमाणात ताण आला आणि परिणामी अनेकांना उपचाराअभावी आपला प्राण गमवावा लागला. परंतु, अलिकडे देशातील रुग्णसंख्या हळूहळू आटोक्यात येत असल्याचं दिलासादायक चित्र आहे. त्यातच आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंर्दभात आरोग्य तज्ज्ञांनी महत्वाची माहिती दिली आहे.

लसीकरणाने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला थोपवणे शक्य आहे. 20 टक्के लसीकरण झालेल्या देशात कोरोनाची तिसरी लाट येणार नाही, अशी माहिती आरोग्य तज्ज्ञांनी दिली आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार, अमेरिका, ब्रिटन, इटली, फ्रान्समध्ये तिसरी लाट येण्याची शक्यता खूप कमी आहे. त्यामुळे आता पाश्चिमात्य देशांना कोरोनापासून लवकरच सुटका मिळण्याची शक्यता आहे.

लसीकरणाच्या बाबतीत भारत काटावर पास झाल्याचं चित्र आहे. आता भारतातही मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरु आहे. त्यामुळे आता संपूर्ण जगाचं लक्ष भारताकडे लागलेलं आहे. कारण भारतातही 20.95 टक्के लसीकरण पूर्ण झालं आहे. त्यामुळे कोरोना भारतात काय परिस्थिती घेऊन येणार याकडे सर्व शास्त्रज्ञ आणि आरोग्य तज्ज्ञांचं लक्ष लागलं आहे.

अमेरिकेत दर तीन महिन्यांनी संक्रमणाची लाट येत होती. आता लसीकरणाची गती वाढल्यानं त्या ठिकाणी कोरोनाची लाट थोपवण्यात अमेरिकेला यश आलं आहे. कोरोनाची पुढील लाट थोपवण्यासाठी 70 टक्के लोकांना कमीत कमी एका डोसचं लसीकरण करण्याची गरज असल्याचं आरोग्य तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

देवेंद्र फडणवीस लढवय्ये नेते, महाराष्ट्राला त्यांची गरज, त्यांचं भविष्य उज्ज्वल आहे- संजय राऊत

बंदी असतानाही फिरायला जाणं पडलं महागात; लोणावळ्यात 900 पर्यटकांकडून ‘इतक्या’ लाखांचा दंड वसूल

“सर्वकाही सुरळीत आणि मनाप्रमाणे होईल, पण देवेंद्र फडणवीस संन्यास घेऊ नका”

“आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून ही संजय राऊतांची सवय”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More