मुंबई | आयपीएल हंगामानंतर तात्काळ सराव न करता आराम करण्याचा सल्ला बीसीसीआयने भारतीय संघाला दिला आहे. 30 मे रोजी विश्वचषकाला सुरूवात होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर बीसीसीआयने हा सल्ला दिल्याचं कळतंय.
2018 सालामध्ये भारतीय संघ एकामागोमाग एक मालिका खेळत आहे. त्यातच आयपीएल आणि विश्वचषक स्पर्धेत काहीच दिवसांचे अंतर असल्यामुळे बीसीसीआयने भारतीय संघाला आराम करण्याचा सल्ला दिला आहे.
22 मे रोजी भारतीय संघ हा इंग्लंडला रवाना होणार आहे. त्याआधी भारतीय संघाने सराव न करता आपल्या परिवारासोबत वेळ घालवावा, असं भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफने सुचवल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, 30 मे पासून क्रिकेटच्या जागतिक उत्सवाला सुरूवात होत असून भारताचा पहिला मुकाबला 5 जूनला दक्षिण आफ्रिकेसोबत होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
–नायडूंनी लावलाय भेटींचा धडाका; पवारांनंतर आता या दिग्गज नेत्यांच्याही घेणार भेटी
-मोदी-शहांची दादागिरी चालते, मग ममतांनी केली तर काय बिघडलं?- राज ठाकरे
-उत्तर प्रदेशची ‘कमान’ एकट्या प्रियांकांनी सांभाळली! राहुल गांधींवर प्रियांका पडल्या भारी
-“निवडणुकीत हरलो तर अमित शहा जबाबदार… हेच मोदींना दाखवायचे होते”
-टाईम मासिकात मोदींचा ‘डिव्हायडर इन चिफ’ उल्लेख; त्यावर मोदी म्हणतात…
Comments are closed.