बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कोणतीच व्हॅक्सिन शंभर टक्के संरक्षण करू शकत नाही”

नवी दिल्ली | भारतातील व्हॅक्सिन कोरोनाच्या नव्या स्ट्रेन विरोधात परिणामकारक ठरली आहे. अर्थात काही घटनांमध्ये दोन डोस घेणाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं दिसून आलं आहे. काही लोकांना अॅडमिटही करावं लागलं आहे. काही प्रकरणात असं होतं यात काही विशेष नाही. कारण कोणतीच व्हॅक्सिन शंभर टक्के संरक्षण करू शकत नाही, असं जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी म्हटलं आहे.

भारतात कोरोनाच्या अनेक लाटा येऊ शकतात. त्यामुळे भारताच्या अडचणी वाढू शकतात. कोरोनाच्या लढाईत पुढील 6 ते 18 महिने भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत, असं जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी सांगितलं. त्या द हिंदू या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होत्या.

B1.617 कोरोना अत्याधिक संसर्ग पसरविणारा व्हेरिएंट आहे. व्हेरिएंट्स मूळ रुपाने म्यूटेट किंवा विकसित व्हर्जन असतं. त्यामुळे याचे व्हायरल जीनोममध्ये परवर्तित होतात. ही सामान्य बाब आहे. आरएनए व्हायरस जसजसे मल्टिप्लाय होतात, त्यामुळे व्हायरसला रेप्लिकेट करण्यास मदत मिळते. या व्हायरसमुळे थोडा बदल होतो. ही एक एरर आहे. त्याचं काही खास महत्त्व नाही. हे कोणत्याही परिस्थिती व्हायरसला प्रभावित करत नाहीत, असं त्यांनी स्पष्ट केलं.

व्हायरसचा विकास कसा होतो, त्यावरही बरच काही अवलंबून आहे. व्हेरिएंटसच्या विरोधात व्हॅक्सिनची क्षमता आणि व्हॅक्सिनमुळे होणारी इम्युनिटी किती काळ लोकांचा बचाव करेल, हे खूप महत्त्वाचे राहणार आहे. यात बरंच काही बदलत आहे, असं सौम्या म्हणाल्या.

थोडक्यात बातम्या- 

कपल रोमान्स करताना होणाऱ्या आवाजाने शेजारी वैतागला, केलं असं काही की….

आनंदाची बातमी! राज्यात आज नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रूग्णांची संख्या जास्त

दहावीचा निकाल कसा जाहीर करणार?; महत्वाची माहिती आली समोर

‘बॉलिवूडमधील मित्रांनीच माझ्या पाठीत खंजीर खुपसला’; प्रसिद्ध मराठी अभिनेता श्रेयस तळपदेचा खुलासा

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर ऑन फिल्ड; गेट वे ऑफ इंडिया परिसरात जाऊन केली पाहणी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More