बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तळीरामांची चिंता वाढली, दारू विकत घ्यायची असल्यास आता…

औरंगाबाद | कोरोना महामारीने (Corona) संपुर्ण देशभरात हाहाकार माजवला होता. त्यातच देशभरात आता कोरोना आटोक्यात आला असताना कोरोना लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत असताना अनेक लोक कोरोना प्रतिबंधक लस घेण्यास टाळाटाळ करत असल्याचं समोर आलं होतं.

त्यात कोरोना लसीकरण (Corona Vaccine) मोहीम राबवली जात असताना सध्या याला प्रोत्साहन देण्यासाठी औरंगाबाद प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी लसीकरणाला वेग मिळावा यासाठी लस नाही तर दारू नाही, (No Vaccine No Alcohol) ही मोहिम जिल्हाभरात राबवण्यास सुरूवात केली आहे.

दरम्यान, औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात अनेक ठिकाणी लसींचा मोठ्या प्रमाणात साठा तसाच पडून राहत असल्याचं समोर आलं होतं. तसेच त्यासाठी पर्याय म्हणून आणि नागरिकांनी लसीकरणात सहभागी व्हावं यासाठी जिल्हा प्रशासनाने कोरोना लसीकरण केलं नसेल तर दारू देण्यात येऊ नये, असे आदेश जारी केले आहेत.

दारू विक्री करणाऱ्या दुकानातील सर्व कर्मचारी व मालकाचे दोन्ही लसीचे डोस पुर्ण होणं बंधनकारक असणार आहे. तसेच दारू विकत घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीचा कोरोना लसीचा किमान एक डोस पुर्ण होणं गरजेचं आहे. त्यामुळे आता तळीरामांची चांगलीच दैना होणार असल्याचं या निर्णयातून स्पष्ट होत आहे. तसेच लसीकरणाचा टक्का या निर्णयामुळे वाढणार का?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या

महाविकास आघाडीत नाराजीचा सुर; शिवसेना मंत्र्याचे राष्ट्रवादीवर गंभीर आरोप

महाराष्ट्रातील कोरोना रूग्णसंख्येत मोठी घट, वाचा आकडेवारी एका क्लिकवर

“नरेंद्र मोदी सहजासहजी माघार घेणार नाहीत, त्यांनी माफी मागितली म्हणजे…”

अमाप रिटर्न्स देणाऱ्या क्रिप्टोकरन्सीचं काय होणार?, केंद्र सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत

वीजतोडणीचा प्रश्न पेटला, शेतकऱ्यांसाठी आमदाराचा गळफास घेण्याचा प्रयत्न

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More