नवी दिल्ली | टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला जसप्रीत बुमराहने मागे टाकत आपल्या नावावर एक अनोखा विक्रम केलाय. वार्षिक उत्पन्नाच्या बाबतीत जसप्रीत बुमराहने कोहलीला पछाडलंय.
बुमराह 2020 यंदाच्या वर्षात भारताकडून सर्वाधिक क्रिकेट खेळून सर्वात जास्त उत्पन्न कमावणारा खेळाडू बनलाय. भारतासाठी 2020 या वर्षात क्रिकेट खेळलेल्या खेळाडूंना बीसीसीआयकडून देण्यात आलेली आणि तसंच दिली जाणार असलेल्या रक्कमेची बेरीज पाहता बुमराह सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू ठरलाय.
वर्षभरात जसप्रीत बुमराहने सर्वाधिक क्रिकेट खेळून बीसीसीआयकडून 1.38 कोटी रुपये कमावलेत. तर या यादीत विराट कोहली दुसऱ्या तर रवींद्र जडेजा तिसऱ्या क्रमांकावर आहे.
दरम्यान रोहित शर्मा सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंमध्ये पहिल्या 5 मध्येही नाही. फिटनेसच्या कारणामुळे रोहित शर्माला यावर्षी बऱ्याच मॅच मुकाव्या लागल्यात.
थोडक्यात बातम्या-
मध्य प्रदेशात लव्ह जिहाद विधेयकाला मंत्रिमंडळात मंजुरी!
लठ्ठ व्यक्तींनो वेळीच सावध व्हा; संशोधनातून समोर आला मोठा धोका!
रामाला मानणारे वचन कसे मोडतात- अण्णा हजारे
“अशोक चव्हाणांची हकालपट्टी करा आणि त्यांच्या जागेवर…”
फेसबूक पोस्ट करत महिलेचा अमिताभ बच्चन यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली…