बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नवीन नेतृत्व तयार झालंय, राष्ट्रवादीच्या भविष्याची चिंता नाही- शरद पवार

मुंबई | ज्याप्रमाणे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनंतर शिवसेनेचं काय होईल अशा प्रश्न विचारला जात होता, त्याचप्रमाणे शरद पवारांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं काय भविष्य असेल, असे प्रश्न कार्यकर्ते विचारत असतात, त्यांच्या या प्रश्नाला आता खुद्द शरद पवारांनी उत्तर दिलं आहे. नवीन नेतृत्व तयार झालंय, राष्ट्रवादीच्या भविष्याची चिंता नाही, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.

सलग पंधरा वर्ष आपण सत्तेत होतो मग त्यानंतर सत्ता गेली. त्या काळात काही नेत्यांनी पक्ष सोडला पण त्यामुळे अनेक नवीन नेतृत्व तयार झाले. त्या आधी त्यांचं कर्तृत्व कधी दिसलं नाही, पण आता ते जबाबदारीने आपलं काम करत आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या भविष्याची चिंता नाही, अशी भावना शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकांतात भेट झाली. त्यावर अनेकांनी तर्कवितर्क लढवले होतो. त्यावेळी अनेकांनी शंकाकुशंका घेतल्या. या शंका घेणारे वेगळ्या नंदनवनात राहत आहे. शिवसेना हा सर्वात विश्वासहार्य पक्ष आहे, असं शरद पवार म्हणाले आहेत. तर महाविकास आघाडीतील सरकार पाच वर्षे टिकेल, असं त्यांनी म्हटलंय.

दरम्यान, आपण महाराष्ट्रातील लोकांना महाविकास आघाडीचा पर्याय दिला, त्यावर विश्वास ठेऊन लोकांनी तो पर्याय स्वीकारला. आजच्या घडीला महाविकास आघाडी सरकार उत्तमरित्या काम करत असल्याचंही शरद पवार म्हणाले आहेत. कोरोना काळात राज्याचे आरोग्यमंत्री म्हणून राजेश टोपे यांनी केलेल्या कामाची स्तुती शरद पवार यांनी केली.

थोडक्यात बातम्या-

शाहु-फुले-आंबेडकर विचारांनीच महाराष्ट्र चालेल- अजित पवार

“…म्हणून भाजपला गेल्या सात वर्षांपासून यश मिळतंय”

तहान भागवण्यासाठी हत्तीने केलं असं काही की…; व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल अवाक्

निवडणुकीत मुंबईकर शिवसेनेला जागा दाखवून देतील- चंद्रकांत पाटील

बारावी नापास म्हणून ‘खिल्ली’ उडालेल्या मनसे नेत्यानं जिद्धीनं पूर्ण केली पदवी!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More