मनोरंजन

सुशांतच्या वडिलांनी 25 फेब्रुवारी रोजी कोणतीही लेखी तक्रार दिली नाही; मुंबई पोलिसांचा खुलासा

मुंबई | सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात दररोज नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. नुकतंच सुशांतच्या वडिलांनी एका व्हिडिओमध्ये खळबळजनक दावा केलाय. सुशांत संकटात असल्याबाबत 25 फेब्रुवारीला मी वांद्रे पोलिसांना कळवलं होतं असं त्यांनी व्हिडिओत म्हटलंय. मात्र, मुंबई पोलिसांनी याबाबत खुलासा करत 25 फेब्रुवारीला कोणतीही लेखी तक्रार केली नसल्याचं म्हटलंय.

ओ. पी. सिंग (आयपीएस) हे सुशांतचे मेहुणे असून त्यांनी तत्कालीन पोलीस उपायुक्त (झोन – ९) यांना याबाबत व्हॉट्स अ‍ॅपद्वारे मेसेज केले होते. त्यावर पोलीस उपायुक्त (झोन – ९) यांनी सिंग यांना कॉल केला. त्यावेळी या तपासासाठी किंवा कारवाई करण्यासाठी लेखी तक्रार बंधनकारक असल्याने लेखी तक्रार देण्यास विनंती केली होती.

मात्र. सिंग यांनी तोंडी तक्रारीवर तपास करण्यास कळवलं. मात्र त्यावर झोन- 9 चे तत्कालीन पोलीस उपायुक्त यांनी स्पष्टपणे लेखी तक्रारीशिवाय शक्य नसल्याचं कळवलं असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिलीये.

सुशांतचे वडील के के सिंग त्यांच्या व्हि़डिओमध्ये म्हणतात, 25 फेब्रुवारी रोजी सुशांत संकटात असल्याचं मी मुंबई पोलिसांना सांगितले होते. 14 जून रोजी त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर मी मुंबई पोलिसांनी 25 फेब्रुवारीच्या तक्रारीत दिलेल्या नावांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. मात्र त्याच्या मृत्यूच्या 40 दिवसांनंतरही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यानंतर मी पाटण्यात एफआयआर दाखल केला.

महत्त्वाच्या बातम्या-

सम-विषम फॉर्म्युला बंद, मुंबई महापालिकेचा दुकानांनबाबत महत्त्वपूर्ण निर्णय

वर्दीतलं रक्षाबंधन…. ‘महिला कर्मचाऱ्यांचा मोठा भाऊ म्हणून मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा!’

पुण्यात वाढती कोरोना रूग्णांची संख्या, 15 दिवसांत जम्बो सेंटर उभे करण्याचा मानस

‘मुंबई पोलीस तुम्ही आमची शान आहात’, सुशांत प्रकरणावर राजकारण करणाऱ्यांना केदार शिंदेंनी खडसावलं!

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी निलेश राणेंचा गंभीर आरोप, म्हणाले….

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या