आरोग्य मुंबई

ट्विटरवर ट्रेंड होतोय #NoBraDay, जाणून घ्या कारण…

मुंबई | जगभरात ऑक्टोबर महिना ‘ब्रेस्ट कँसर अवेयरनेस मंथ’ म्हणून ओळखला जातो. सध्या ट्वीटरवर ‘#NoBraDay’ असा नवीन ट्रेंड  सुरू आहे. या ट्रेंडच्या माध्यामातून महिलावर्ग ब्रेस्ट कॅन्सरपासून बचावाचं जागरूकतेच काम केलं जात आहे.

‘#NoBraDay’ या मोहिमेची सुरूवात दक्षिण कोरीयामधील सिंगर आणि अ‌भिनेत्री सुली हीने केली. तिने आपल्या ऑफिशिअल इंस्टाग्राम अकाऊंटवर ब्राशिवाय आपली फोटो पोस्ट केले आहेत. ती कोरीयामध्ये #NoBraDay मोहिमेची प्रतीक बनली.

कोरीयाच्या महिलांनी या मोहिमेला दुजोरा देत आपले ब्राशिवायचे फोटो पोस्ट करायला सुरूवात केली. ही मोहिम पहिल्यांदा फक्त दक्षिण आफ्रीकेत चालवली जात होती. मात्र आता ही मोहिम जगभरात पसरत आहे. एका दशकाआधी ब्रेस्ट कँसरच्या बाबतीत जगभरात भारत पहिल्या स्थानावर होता, असं मीडिया रिपोर्ट्समधून समोर आलं आहे. 

भारतात हा रोग प्रत्येक वर्षी एक लाखापेक्षा जास्त स्त्रियांना झाल्याचं दिसून येत आहे. स्त्रियांना होणाऱ्या कँसरच्या प्रकारात 30 टक्के प्रमाणात ब्रेस्ट कँसर असतो. या रोगाच्या तिसऱ्या आणि चौथ्या स्टेजवर जर उपचाराला रूग्णाकडून प्रतिसाद मिळाला नाही तर मृत्यूचा धोका निर्माण होऊ शकतो.

महत्तवाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या