देश

नोएडा पोलिसांनी प्रियांका गांधी यांची माफी मागितली, म्हणाले…

नोएडा | प्रियांका गांधी यांचा कुर्ता धरून एका पोलिसाने त्यांना धक्काबुक्की केल्याबद्दल गौतम बुद्धनगर पोलिसांनी प्रियांका गांधी यांची माफी मागितली असून, याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. शनिवारी डीएनडी उड्डाणपुलावर हा प्रकार घडला होता.

अनियंत्रित गर्दी आवरताना घडलेल्या या घटनेबद्दल नोएडा पोलिसांनी खेद व्यक्त केला. चौकशीनंतर दंडात्मक कारवाई केली जाईल, असंही पोलिसांनी सांगितलंय.

पोलीस उपायुक्तांनी या घटनेची स्वत:हून गंभीरतेने दखल घेत वरिष्ठ महिला अधिकाऱ्यामार्फत चौकशीचे आदेश दिले आहेत. नोएडा पोलीस महिलांचा सन्मान आणि सुरक्षेसाठी कटिबद्ध आहेत, असं जिल्हा पोलीस मुख्यालयाने जारी केलेल्या निवदेनात म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

पंजाब विरूद्धच्या सामन्यात महेंद्रसिंह धोनीचं असंही अनोखं शतक!

अब ना छोडेंगे हम! चेन्नईचं जबरदस्त पुनरागमन, 10 विकेट्सने केला पंजाबचा पराभव

‘रिया चक्रवर्तीला त्रास देऊ नका, तिला सोडून देण्यात यावं..’; काँग्रेस नेत्याची मागणी

‘सुशांत प्रकरणातील एवढी मोठी गोष्ट महाराष्ट्र सरकारने का लपवून ठेवली?’; भाजपच्या आमदाराचं मुख्यमंत्र्यांना पत्र

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या