Top News

“कोरोना तर काहीच नाही अजून 2 मोठी संकटं येणार”

वॉशिंग्टन | कोरोना व्हायरसचे भयंकर परिणाम जगभरात दिसून येत आहेत. पण आपण सगळेचजण यामधून बाहेर येऊ शकतो. पण इतर दोन संकटापासून वाचणं कठीण आहे. यामुळे सर्वच उध्वस्त होऊ शकतं, असं अमेरिकेतील भाषावाद आणि राजनैतिक विश्लेषक नॉम चॉम्स्की यांनी म्हटलंय.

क्यूबा यूरोपची मदत करत आहे पण जर्मनी ग्रीसची मदत करण्यासाठी तयार नाही. कोरोना व्हायरसची माहामारी आपल्या कशाप्रकारचं जग हवयं असा विचार करण्यास प्रवृत्त करत आहे. सार्स माहामारी स्वरूप बदलून कोरोना व्हायरसच्या रुपात समोर येऊ शकते. याची कल्पना आधीपासूनच होती, असं नॉम चॉम्स्की म्हणालेत.

ऑक्टोबर 2019 मध्ये अमेरिकेनं कोरोनासारख्या माहामारीबाबत शंका व्यक्त केली होती. पण कोणीही या कडे फारसं लक्ष दिलं नाही. 31 डिसेंबरला चीननं जागतिक आरोग्य संघटनेला निमोनिया बाबत सुचित केलं त्यानंतर एका आठवड्यानंतर चीनी वैज्ञांनिकांनी कोरोना व्हायरसचं रुप ओळखलं. त्यानंतर संपूर्ण जगाला याबाबत कल्पना देण्यात आली, असं नॉम चॉम्स्की म्हणाले.

श्रीमंत देश कोरोना व्हायरसच्या लसीवर काम करू शकत होते. परंतू त्यांनी असं काही केलेलं नाही. मनमानी पद्धतीनं औषध आणि लसीचा कारभार केला जात आहे, असंही चॉम्स्की यांनी सांगितलंय.

महत्वाच्या बातम्या-

“धनगर आरक्षण न मिळाल्यास सरकारला सळो की पळो करु”

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी शंख वाजवण्याचा सल्ला देणाऱ्या भाजप खासदाराला कोरोनाची लागण!

“हिंदी सिनेसृष्टीत घराणेशाही ही चंद्र, सूर्याइतकीच लख्ख आहे”

उद्धव ठाकरेंऐवजी फडणवीस मुख्यमंत्री असते तर…- कंगणा राणावत

कांदा निर्यात बंदीचा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार- दादा भुसे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या