देशाच्या राजकारणात खळबळ! शरद पवारांच्या पुढाकाराने मुंबईत मोठी बैठक होणार
मुंबई | गेेल्या काही दिवसांपासून संयुक्त पुरोगामी आघाडीचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस सर्वेसर्वा शरद पवारांनी करावे, अशी मागणी करण्यात येत आहे. देशभरातील विरोधकांची मोट बांधण्यासाठी शरद पवार प्रयत्न करत आहेत. त्यातच आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी गैरभाजपा मुख्यमंत्री महाराष्ट्रात एकवटणार असल्याची माहिती दिली आहे. या बैठकीसाठी शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढाकार घेणार, असल्याचं संजय राऊतांनी म्हटलं आहे.
महागाईपासून ते बेरोजगारीपर्यंत सर्व विषयांवर चर्चा होणार, असल्याचं म्हटलं आहे. तसेच केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडींवर या बैठकीत चर्चा होणार असल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोधकांची बैठक घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार ही बैठक होणार आहे. स्वत: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीसाठी पुढाकार घेणार आहेत, अशी माहिती संजय राऊतांनी दिली आहे.
दरम्यान, राजकीय फायद्यासाठी आणि निवडणूक जिंकण्यासाठी देशातील वातावरण खराब केलं जात आहे. हे देशासाठी योग्य नाही. काल हनुमान जयंतीच्या मिरवणूकीवर हल्ला झाला. यापुर्वी असं कधीही झालं नाही. राजकीय स्पॉन्सर्ड हल्ले सुरू आहेत. हिंदू मुस्लिम दंगे व्हावेत यासाठी हे सर्व सुरू आहे, असा घणाघात संजय राऊतांनी केला.
थोडक्यात बातम्या-
“हनुमान चालिसाच्या दोन ओळी म्हणता येत नाहीत अन्…”
“गुणरत्न सदावर्ते यांची जीभ कापून आणणाऱ्याला ‘इतक्या’ लाखांचं बक्षिस”
Raj Thackeray | ‘3 तारखेनंतर भोंगे हटवले नाहीत तर…’; राज ठाकरेंचा इशारा
पत्रकार परिषद घेत राज ठाकरेंनी केल्या ‘या’ दोन मोठ्या घोषणा
धक्कादायक ! भर उन्हात लग्नात डान्स केल्यानं तरुणाचा मृत्यू
Comments are closed.