बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लसीचा एकही डोस न घेतलेल्या कर्माचाऱ्यांना झटका; सरकारने घेतला मोठा निर्णय

नवी दिल्ली | सरकारकडून वारंवार लस घेण्यासाठी सूचना दिल्या जात आहेत. पण अजूनही असे काही नागरिक आहेत जे सरकारच्या सूचनांकडे कानाडोळा करत आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी लस घ्यावी यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा एकही डोस घेतला नसेल ते हजर असूनही गैरहजर ग्राह्य धरले जाणार आहेत.

कोरोना लसीकरणाला गती देण्यासाठी दिल्ली सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचा एकही डोस न घेतलेले कर्मचारी आता ऑन लिव्ह मानले जाणार आहेत. म्हणजेच कर्मचारी हजर असतील तरी त्यांची हजेरी आणि काम दोन्ही गृहित धरलं जाणार नाही. ज्यांनी अजूनही लस घेतली नाही त्यांनी 15 ऑक्टोबर पर्यंत लसीचा किमान पहिला डोस घेण्याचा इशारा सरकारने दिला आहे.

दिल्ली सरकारचा हा निर्णय सरकारी कर्मचाऱ्यांसह निमशासकीय कर्मचाऱ्यांना देखील लागू करण्यात आला आहे. या कर्मचाऱ्यांत सर्व सरकारी कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स, आरोग्य कर्मचारी, महाविद्यालयांचे शिक्षक, शाळांचे शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना लसीचा किमान पहिला डोस घेण्यासाठी 15 तारखेपर्यंतचा अल्टीमेटम देण्यात आला आहे.

ज्या सरकारी कर्मचाऱ्यांनी लस घेतली नाही त्यांना गैरहजर ठरवलं जाणार आहे. त्यांच्या नावावर रजा शिल्लक जरी असली तरी त्यांना ऑन लिव्ह समजलं जाणार आहे. आणि रजा शिल्लक नसतील तर गैरहजर समजून पगार देखील कापला जाईल, असं दिल्ली सरकारने जारी केलेल्या आदेशात नमूद करण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या-

सिद्धार्थच्या मृत्यूनंतर शेहनाज पहिल्यांदाच आली समोर, पाहा व्हिडीओ

‘जे कोरोना लस घेतील त्यांना फ्रीमध्ये…’; पॉर्नस्टारने दिलेल्या ऑफरने खळबळ

काँग्रेसची दुखणी साध्या उपायांनी बरी होणार नाहीत- प्रशांत किशोर

अखेरचा चेंडू अन् 6 धावा; श्वास रोखून धरणाऱ्या सामन्यात विराटच्या शिलेदाराचा चमत्कार, पाहा व्हिडीओ

“दोषींवर कारवाई होईपर्यंत मी जागेवरून हालणार नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More