अभिनेत्रीने वयाच्या 37 व्या वर्षी संपवलं आयुष्य, पोलिसांना वेगळाच संशय!

Noor Malabika Das | बाॅलिवूडमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. नूर मलाबिका दास या अभिनेत्रीने आयुष्य संपवलं आहे. नूर मलाबिकाच्या निधनाने संपूर्ण बाॅलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

समोर आलेल्या माहितीनूसार नूर मलाबिकाचा मृतदेह तिच्या राहत्या घरात आढळला. नूर मलाबिकाच्या आत्महत्या करण्यामागचं कारण अस्पष्ट असल्याचं पोलिसांनी सांगितलं. मात्र, पोलिसांनी तिचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवला. पोस्टमार्टेमनंतर तिच्या मृत्यूचं नेमकं कारण समोर येईल.

नेमकं काय घडलं?

नूर मलाबिका (Noor Malabika Das)  या बाॅलिवूड अभिनेत्रींने काजोलची (Kajol) मु्ख्य भूमिका असलेल्या ‘द ट्रायल’ या वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. नूर मलाबिकाने व्याच्या 37 व्या वर्षी आयुष्य संपवलं. माध्यमांना मिळालेल्या माहितीनूसार नूर मलाबिका हिने राहत्या घरी आत्महत्या केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दरवाजा बंद होता आणि अचानाक घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने शेजारी राहणाऱ्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Noor Malabika (@noormalabika1)

कुठे राहत होती

नूर मलाबिका (Noor Malabika Das) ही गोरगाव येथे भाड्याच्या घरात राहत होती. नूर हिचा मृतदेह सिद्धार्थ रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांकडून तिच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र कोणीही समोर आले नाही. त्यामुळे पोलिसांनी अखेर रविवारी एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने रविवारी 9 जून रोजी तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.

News Title : Noor Malabika Das found dead

महत्त्वाच्या बातम्या-

“बारामतीत एकच दादा अजित दादा, दुसरा कोणी दादा होणार नाही”

काल शपथ घेतली, आज खासदार म्हणतोय ‘मला मंत्री व्हायचं नाही’

बॉलिवूडमध्ये खळबळ! ‘या’ अभिनेत्रीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला

मोदींनी पंतप्रधानपदाचा स्विकार करताच शेतकऱ्यांसाठी उचललं मोठं पाऊल!

मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारला दिला थेट इशारा!