मोठी बातमी! अभिनेत्री नोरा फतेही ईडीच्या जाळ्यात

नवी दिल्ली | महाठग सुकेश चंद्रशेखर(Sukesh Chandrasekhar) सध्या तुरुगांत आहे. अनेक अभिनेत्रींना आणि व्यवसायिकांना लुबाडणाऱ्या सुकेश चंद्रशेखर याला ईडीने अटक केली होती. त्याच्या या अटकेत अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीसचे नाव समोर आले होते.

अनेकदा ईडीकडून तीची कसून चौकशी करण्यात आली आहे. नुकताच जॅकलीनला थोडासा दिलासा मिळाला आहे. अटकेपासून तिचा बचाव झाला आहे. तर दुसरीकडे आता अभिनेत्री नोरा फतेहीचा (Nora Fatehi) पाय खोलात जाण्याची शक्यता आहे.

पीटीआयच्या (PTI) रिपोर्टनुसार सुकेश चंद्रशेखरला अटक केलेल्या मनी लाॅन्ड्रीग(Money Laundering) प्रकरणात नोरा फतेहीचं नाव देखील आलं आहे. त्यासाठीची जबानी नोंदवण्यासाठी नोरा शुक्रवारी ईडी कार्यालयात गेली असल्याचं पहायला मिळालं.

दुसरीकडे अजून एका वादावरुन ती सध्या टिकेची धनी ठरत आहे. एका कार्यक्रमादरम्यान स्टेजवर नोरा फतेही नाचत होती. त्यावेळी गर्दीतील एका चाहत्याने तिच्याकडे भारताचा (India) तिरंगा झेंडा दिला. तो झेंडा नोराने रुमालासारखा गुंडाळला. त्यामुळे नागरिकांमध्ये तिच्याविषयी रोष निर्माण झाला आहे.

काही दिवसांपूर्वी सुरेश चंद्रशेखरने जेलमधून एक पत्र लिहिलं ज्यात त्याने जॅकलीनचा या प्रकरणाशी काही संबंध नसल्याचं सागितलं. मी करत असलेलं कोणतंही काम जॅकलीनला माहित नव्हतं. तीनं फक्त माझ्याकडून प्रेमाची अपेक्षा केली होती. ती आपल्याशी लग्न देखील करणार होती असं त्यानं त्या पत्रात लिहिलं होतं.

सुकेश चंद्रशेखर याने अनेकांना खोटे अमिश दाखवत पैसे लुटले आहेत. एका मोठ्या प्रकरणात 200 कोटींची अफरातफर केल्याचं समजात पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्याने अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) आणि नोरा फतेहीला महागडे गिफ्ट दिल्याचं तपासात निष्पन्न झालं होते. त्यामुळे त्या दोघींची चौकशी सुरु आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More