बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनानंतर नोरोव्हायरसचा धुमाकूळ; इंग्लडमध्ये अलर्ट जारी

लंडन | जगभरात कोरोनाची एकामागून एक लाटा येत आहेत. येत्या काही दिवसात भारतात देखील कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर जगभरात डेल्टा प्लसच्या व्हायरसने धुमाकूळ धातला असल्याचं चित्र आहे. त्यामुळे जगात आता कोरोनाची चौथी आणि पाचवी लाट येण्याची शक्यता आहे. त्यातच आता इंग्लंडमध्ये एका नव्या व्हायरसने डोकेदुखी वाढवली आहे.

इंग्लडमध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. मात्र, नोरोव्हायरसच्या वाढत्या प्रभावामुळे इंग्लंडमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. पब्लिक हेल्थ ऑफ इंग्लंडने हा अलर्ट जारी केला आहे. मे महिन्यानंतरच्या पुढील पाच आठवड्यात इंग्लंडमध्ये 154 जणांना नोरोव्हायरसची लागण झाली आहे. गेल्या 5 वर्षात या व्हायरसच्या रुग्णसंख्येत वाढ होण्याचं प्रमाण हे 3 पटीनं वाढलं आहे.

नोरोव्हायरस हा एक संसर्गजन्य आजार आहे. या व्हायरसचा संसर्ग झालेल्या रूग्णांना उलट्या आणि मळमळीचा त्रास होतो. त्याचबरोबर उलट्या आणि पोटदुखीच्या समस्या देखील उद्भवतात. तर पोटाला आणि आतड्यांना सुज देखील येते. तर ताप, डोखेदुखी आणि अंगदुखीच्या समस्या उद्भवतात. या व्हायरसचा संसर्ग खूप वेगाने होतो. रूग्णाच्या थुंकीतून लगेच संसर्ग पसरण्याची शक्यता असते.

दरम्यान, या आजारावर अद्याप कोणताही औषध बाजारात उपलब्ध नाही. भारतात सध्या या व्हायरसचा एकही रूग्ण नसल्याची माहिती मिळत आहे. पण हा व्हायरस वेगानं पसरत असल्यानं तो भारतात धुमाकूळ घालू शकतो, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.

थोडक्यात बातम्या-

“अभ्यास नंतर करा आधी पूरग्रस्तांना तातडीची मदत करा”

…म्हणून आम्ही पहिल्या दिवशी पूरग्रस्तांकडे जाणं टाळलं- शर्मिला ठाकरे

राजकारणातील एका सत्वशील पर्वाचा अस्त; ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख काळाच्या पडद्याआड!

महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती सुधारतेय; पाहा आजचे सकारात्मक आकडे

दिलासादायक! पुण्यात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत मोठी घट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More