Top News

“कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी किम जोंग उन लांब राहतायत”

प्योंगयांग | उत्तर कोरियाचे हुकुमशाह किंम जोंग उन यांच्या प्रकृतीबद्दल जगभरात उलट-सुलट चर्चा सुरु आहेत. किमवर शस्त्रक्रिया झाली असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं वृत्त काही माध्यमांनी दिलं आहे. लवकरच किम यांची जागा त्याच्या कुटुंबातील सदस्य घेणार अशी सुद्धा चर्चा आहे.

सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण कोरियातील एका मंत्र्याने भाष्य केलंय. किम आजारपणामुळे नव्हे तर करोना व्हायरसमुळे सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर रहात असावेत, असं म्हटलं आहे. या मंत्र्याकडे उत्तर कोरियाशी संबंधित विषयाची जबाबदारी आहे.

किम जोंग उन उत्तर कोरियाचे संस्थापक आणि आजोबा किम द्वितीय संग यांच्या जयंतीदिनाच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्यापासून या चर्चा सुरु झाल्या आहेत. उत्तर कोरियात नेहमीसारखं सुरु आहे. कुठल्याही वेगळया हालचाली दिसलेल्या नाहीत, असं दक्षिण कोरियाने म्हटलं आहे.

सत्तेत आल्यापासून किम यांनी कधीही आपले आजोबा किम द्वितीय संग यांच्या जयंतीचा कार्यक्रम चुकवलेला नाही. पण सध्या अनेक वार्षिक कार्यक्रम करोना व्हायरसच्या संकटामुळे रद्द करण्यात आल्या आहेत, असं दक्षिण कोरियाच्या मंत्र्याने सांगितलं.

ट्रेंडिंग बातम्या-

बंदुक द्या पोलीसांना! काठ्या माणसांसाठी असतात यांच्यासाठी तर … – हेमंत ढोमे

लुडोत हरवल्याने रागाच्याभरात नवऱ्याने मोडला बायकोच्या पाठीचा कणा !

महत्वाच्या बातम्या-

अभिनेता इरफान खानची प्रकृती बिघडली; आयसीयूमध्ये उपचार सुरु

मेहूल चोकसी, रामदेव बाबांसह अनेक कर्जबुडव्यांचं 68 हजार कोटी कर्ज माफ

‘मोदीजी आता अधिकच्या नोटा छापा’; पृथ्वीराज चव्हाणांचा सल्ला

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या