बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भारतात कोरोनामुळे 4 लाख नव्हे तर 50 लाख मृत्यू”, या दाव्यानं मोठी खळबळ

वाॅशिंग्टन | कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं दिसून येत असतानाच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत दिले जात आहेत. त्यामुळे लाॅकडाऊनचे नियम शिथील होत असले तरी सर्वांनी खबरदारी बाळगावी अशा वारंवार सूचना सरकारकडून दिल्या जात आहेत. अशातच कोरोना संसर्ग आणि मृत रुग्णांच्या संख्येत अमेरिका पहिल्या स्थानावर आहे. अमेेरिकेत केलेल्या अभ्यासात भारतातील कोरोना रुग्णांच्या संख्येत धक्कादायक गोष्ट समोर आल्या आहेत.

भारतात कोरोना संसर्गामुळे 34 ते 49 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे, असं अमेरिकेच्या संशोधनातून समोर आलं आहे. मात्र भारतानं दिलेल्या कोरोनाच्या आकडेवारीपेक्षा ही संख्या दहापटीनं जास्त आहे, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. जानेवारी 2020 ते जून 2021 या काळात भारतात कोरोनामुळे जवळपास 50 लाख लोकांचा मृत्यू झाला असल्याचं अमेरिकेतील संशोधन अभ्यासात म्हटलं आहे.

वर्ल्डोमीटर या वेबसाईटवर नमूद केल्यप्रमाणं भारतात कोरोनाबाधितांची संख्या 3 कोटी 12 लाखांहून अधिक असल्याचं समोर येत आहे. या वेबसाईटवर 4 लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, भारतामध्ये आतापर्यंत 4.14 लाखांपेक्षा अधिक मृत्यू झाले आहेत. मृतांच्या संख्येत अमेरिका आणि ब्राझीलनंतर भारताचा तिसरा क्रमांक आहे. अमेरिकेमध्ये 6,09,000 आणि ब्राझीलमध्ये 5,42,000 लोकांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

दरम्यान, या अहवालात सरकारी आकडेवारी, आंतरराष्ट्रीय अंदाज, सेरोलॉजिकल रिपोर्ट्स आणि होम इस्फेकेशन याचा आधार घेतला आहे. तर भारतातील कोरोना परिस्थितीचा अहवाल तयार करणाऱ्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रम्हण्यम यांचाही समावेश आहे.

थोडक्यात बातम्या – 

“गुन्हेगार माझे होर्डिंग्स लावत असतील, तर त्यात माझा काय दोष?”

3 महिन्यांचा कारावास भोगलेले भाजपचे माजी आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर?

इथं फक्त सेक्स विकला जातो!; ‘या’ ॲप्सवरही अश्लील व्हिडीओंचा सुळसुळाट

कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांना बाहेर पडण्यास परवानगी मिळणार?

“तुम्हाला लाज वाटली पाहिजे खोटे आरोप करताना”, राज कुंद्रा प्रकरणात राखीची उडी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More