बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आनंदाची बातमी! कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या ‘या’ जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही एकाही कोरोना रूग्णाचा मृत्यु नाही

नागपूर | राज्यात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली होती. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रूग्णांच्या संख्येतही लक्षणीय घट होताना दिसत आहे. अनेक जिल्हे कोरोना मुक्तीच्या वाटेवर आहेत. अशातच एक सकारात्मक बातमी समोर आली आहे.

कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या नागपूर जिल्ह्यात रविवार, सोमवार आणि मंगळवारी एकाही कोरोनाग्रस्ताचा मृत्यु झाला नव्हता. आजही नागपूरमध्ये एकाही रूग्णाला कोरोनामुळे आपला प्राण गमवावा लागला नाही. नागपूर जिल्ह्यात आज अवघ्या 24 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली.

आतापर्यंत 04 लाख 77 हजार 27 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद जिल्ह्यात झाली आहे. आज दिवसभरात नागपूरमध्ये एकाही कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला नसल्याची नोंद करण्यात आली आहे. तसेच आतापर्यंत 9 हजार 025 कोरोनाबाधितांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्युु झाला आहे.

नागपुरमधील कोरोना हळूहळू आटोक्यात येत असल्याचे दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. आज एकूण 138 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. तसेच आतापर्यंत 4 लाख 67 हजार 725 रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. सध्या नागपूर हे कोरोनामुक्त होत असलं तरीही प्रशासनातर्फे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

दरम्यान, कमी रूग्णसंख्येमुळे राज्यभर मुख्यमंत्र्यांनी शिथिलता केली होती. मात्र कोरोनाचा घातक विषाणू असलेल्या डेल्टा प्लसचे रूग्ण सापडल्याने काही जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊनच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रमुख शहरांपैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्यातही पुन्हा कडक निर्बंध लावण्यात आले आहेत.

थोडक्यात बातम्या –

“पंतप्रधान मोदी आजही उद्धव ठाकरे यांच्यासाठी ‘नरेंद्रभाई’”

“भाजप, काँग्रेस आणि समाजवादी पार्टी सर्वजण एकाच माळेचे मणी आहेत”

…..म्हणून कम्प्युटर पदवीधरांना आली काॅंग्रेस मुख्यालयासमोर कोंबडा बनण्याची वेळ

राज्यातील राजकीय घडामोडींना वेग, शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला!

माणूस दिसला की टोचा लस! लसीकरणासाठी ‘या’ ठिकाणी राबवली जातेय अनोखी शक्कल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More