बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आमचे असे मुख्यमंत्री आहेत की, एकही भाषण विकासावर नाही”

मुंबई | राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये सभा होत आहे. हिंदीभाषिक महासंकल्प असा असे सभेचे नाव देण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर लगेचच देवेंद्र फडणवीस यांची उत्तर सभा होत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांवर जोरदार टिका केली आहे.

पूर्ण सभा ऐकल्यानंतर आमच्या लक्षात आले की, ही कालची लाफ्टर सभा आहे. काल कौरवांची सभा झाली. आज पांडवांची सभा इथे होत आहे. मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे की, मुंबईमध्ये कोविड भ्रष्टाचार झाला की नाही?, यासह देवेंद्र फडणवीसांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. आमचे असे मुख्यमंत्री आहेत की, एकही भाषण विकासावर नाही, असा टोला देवेंद्र फडणवीसांनी लगावला आहे.

खरंतर हिंदीभाषिकांचे संमेलन आहे. हिंदी भाषिकांना मराठी देखील समजते. मी जेव्हा म्हणालो अयोध्येत तुमचा एकही नेता नव्हता. किती मिरची लागली. अरे हा मी गेलो होतो बाबरी पाडायला. तुम्ही गेले होते सहलीला. आम्ही सहलीला गेलो नव्हतो, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आज माझं वजन 102 किलो आहे. बाबरी पाडायला गेलो तेव्हा माझं वजन 128 किलो होतं. माझ्या वजनाने बाबरी पडली असेल तर किती माझ्यावर विश्वास?, तुमच्या सत्तेच्या बाबरीच्या ढाच्याला खाली आणणार, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे. कोरोना काळामध्ये उद्धव ठाकरे हे फेसबुक लाईव्ह होते.  कोरोनाच्या दोन वर्षात मैदानात का आला नाहीत, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या- 

काँग्रेस नेते राहुल गांधींची भाजपवर जोरदार टिका, म्हणाले….

‘…अन्यथा सरकारमधून पायउतार व्हा’; अण्णा हजारेंचा राज्य सरकारला इशारा

“पुढील 25 वर्षे शिवसेनाचा मुख्यमंत्री राहिल असं काम करा”

केतकी चितळेच्या वादग्रस्त पोस्टवर सुप्रिया सुळेंचा संताप, म्हणाल्या…

केतकी चितळेच्या वादग्रस्त पोस्टवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More