बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

केंद्रीय मंत्री असो किंवा बादशहा असो कायदेशीर कारवाई होणारच- संजय राऊत

मुंबई | महाराष्ट्रात जे घडतं त्याचे पडसाद देशात उमटतात. उद्धव ठाकरे यांच्यावर नारायण राणे यांनी केलेल्या आक्षेपार्ह टीकेनंतर राज्यातील विविध शहरामध्ये आंदोलन होत आहेत. मुख्यमंत्री हे संवैधानिक पद असल्याने हा महाराष्ट्राचा अपमान असल्याचं बोललं जात आहे.

महाराष्ट्राचं आणि देशातील राजकारण सध्या नारायण राणे यांच्या वक्तव्याने चांगलंच गाजलं आहे. ठाकरे आणि राणे यांच्यातील वाद हा सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला शिवसेना आपल्या खास शैलीत उत्तर देतं आहे. महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणात आता वैयक्तीक टीका ही खूप खालच्या पातळीवर होत असल्याचं पहायला मिळत आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत सुचक वक्तव्य केलं आहे. तुम्ही केंद्रीय मंत्री असाल किंवा बादशहा असाल तुमच्यावर कायदेशीर कारवाई होणारच या शब्दात संजय राऊत यांनी राणेंचा समाचार घेतला. नारायण राणे ज्या शाळेत शिकले आहेत ती शाळा अजुन अबाधित आहे. राणेंवर कार्यवाही व्हावी, असंही राऊत म्हणाले आहेत.

शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांना मंत्रीमंडळातून बेदखल करावं यासाठी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं आहे. शिवसेनेच्या सगळ्या नेत्यांनी याबाबत आपली मतं मांडली आहेत. संजय राऊत हे म्हणाले की, नारायण राणे यांनी शिवसेेनेच्या नादाला लागू नये. नारायण राणे यांच्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही, होईल असंही ते म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या

“राणेंच्या घराला सिंहाची गुहा म्हणणं हा सिंहाचा अपमान”

नारायण राणेंच्या घरासमोर शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी!

…तर नारायण राणेंना अटक होऊ शकते…- असीम सरोदे

उद्धव ठाकरे मोदींना ‘चोर’ म्हणाले, मग त्यांचं काय करायचं?- चंद्रकांत पाटील

“नारायण राणेंना अटक करण्याची तुमच्यात हिंमत नाही”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More