बाबा सिद्दीकी नाहीतर सलमान खान होता टार्गेटवर?, ‘त्या’ खुलाशाने सगळीकडे खळबळ

Baba Siddique | राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येने सगळीकडे एकच खळबळ उडाली. अजून देखील त्यांच्या हत्येबाबत नवीनवीन खुलासे समोर येत आहेत. सलमान खानसोबत जवळीक असल्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली असल्याचं समोर आलं आहे. बाबा सिद्दीकी यांची हत्या बिश्नोई गँगने केल्याचं म्हटलं आहे. दरम्यान यावेळी एक मोठी माहिती समोर आली आहे.

काय आहे प्रकरण?

समोर आलेल्या माहितीनूसार बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांची हत्या करण्यापूर्वी सलमान खानच्या घराचीही रेकी या आरोपींनी केल्याचं तपासात उघड झालंय. आरोपी गुरुनेल सिंगने गेल्या महिन्यात सलमान खानच्या घराची रेकी केली होती. एवढंच नाही तर, सलमानच्या घराची रेखी केल्यानंतर गुरनेल सिंगने त्याचा स्वतःचा फोन खराब केला. 

स्नॅप चार्ट मधून माहिती-

सलमान खानच्या (Baba Siddique) घराची रेखी केल्यानंतर गुरुनेल सिंगने त्याचा फोनचा डिस्प्ले तोडल्याचं उघड झालं आहे. ‘स्नॅप चार्ट’ ॲपच्या माध्यमातून सर्व माहिती आरोपींकडे येत होती. हे आरोपी मिळालेल्या माहितीनंतर लगेचच सर्व मेसेज डिलीट करत असत. या आरोपींनी घरासाठी आधारकार्डही स्नॅपचार्टवर पाठवण्यात आले होते. हैराण करणारे म्हणजे आधारकार्डचा स्क्रिनशॉट घेऊन ते डिलीट करण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या होत्या. म्हणजेच या आरोपींच्या निशाण्यावर फक्त बाबा सिद्दीकी हेच नाही तर सलमान खान हा देखील होता. सलमान खानच्या घराची रेकी नेमकी का केली गेली हे कळू शकले नाहीये. 

News Title : Not Baba Siddique but Salman Khan was on target

महत्त्वाच्या बातम्या-

बीड जिल्ह्यात कुणाचं पारडं जड?, शरद पवार अन् जरांगे पॅटर्न का येतंय चर्चेत?

‘या स्टेप्स फॉलो करा अन् घरबसल्या तपासा मतदार यादीत तुमचं नाव आहे की नाही?

लाडक्या बहिणींना मिळणार 5500 रुपयांचा दिवाळी बोनस; या 3 अटी लागू

राज्यात कोणत्या पक्षाचं किती संख्याबळ?, वाचा सर्व माहिती एका क्लिकवर

बोपदेव घाटातील प्रकरण ताजं असतानाच पुण्यात घडली आणखी एक धक्कादायक घटना!