बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

इरा नाही तर ‘हे’ आहे आमिर खानच्या मुलीचं खरं नाव; चुकीचं नाव उच्चारल्यास आता 5 हजारांचा दंड

मुंबई | बाॅलिवूड अभिनेता अमिर खानची मुलगी सतत सोशल मिडीयावर अॅक्टीव्ह असते. ती आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन सतत अनेक पोस्ट शेअर करत असते. तसेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अनेक मेंन्टल हेल्थबाबतचे पोस्ट आणि व्हिडीओ पाहायला मिळतात. आमिर खानची मुलीने अजून पर्यंत बाॅलिवूडमध्ये पदार्पण केलेलं नाही. मात्र तिच्या फॅन्सची संख्या कोणत्या सेलेब्रिटीपेक्षा कमी देखील नाही.

बाॅलिवूडमध्ये पदार्पण न करता सतत काही ना काही करुन चर्चेत येणाऱ्या आमिर खानच्या मुलीने आपल्या इन्स्टा अकाऊंटवरुन  एक व्हिडीओ शेअर केला. यामध्ये तिने तिचं नाव चुकीच्या पद्धतीने उच्चारलं जात असल्याचं सांगितलं आहे. तिचे नाव इरा नाही तर आयरा आहे, असं तिने या व्हिडीओमध्ये स्पष्ट केलं. आयराच्या ऐवजी इरा नाव वापरले जात असल्यामुळे तिचे मित्र-मैत्रिणी तिची खिल्ली उडवत असल्याचं देखील तिने या व्हिडीओमध्ये सांगितलं आहे.

आयराने तिच्या इन्स्टा खात्यावरुन शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिचं नाव चुकीच्या पद्धतीने उच्चारलं तर 5000 रुपये दंड भरावा लागेल, असं बजावलं आहे. तसेच गोळा करण्यात येणारा दंड ती प्रत्येक महिन्याच्या अखेरीस दान करेल, असं देखील तिने या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, आपल्या नावाचा उच्चार योग्य पद्धतीने करावा असं तिने तिच्या मित्र-मैत्रिणी तसेच मिडीयाला देखील सांगितलं आहे. तसेच असं न झाल्यास 5 हजारांचा दंड भरण्यात यावा अशी इच्छा तिने व्यक्त केली.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Ira Khan (@khan.ira)

थोडक्यात बातम्या-

…म्हणून पतीनेच घराला लावली आग, पत्नी आणि मुलांचा मृत्यू

गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा धक्का, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

कोरोना लसीसंदर्भात जितेंद्र आव्हाडांची मुख्यमंत्र्यांकडे ‘ही’ महत्वाची मागणी

50 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियावरुन भारतात परतणार 82 वर्षांच्या चौकीदाराची प्रेयसी

“एक कोरोनाचा रुग्ण सापडला तर आजूबाजूची 20 घरं करणार सील”

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More