मुंबई | बाॅलिवूड अभिनेत्री एकता कपूरला पद्मश्री पुरस्कार मिळतो. मग माझ्या बाबांना का नाही?, असा सवाल भारताला ऑलिम्पिकमध्ये पहिलं पदक मिळवून देणाऱ्या खाशाबा जाधव यांचा मुलगा रणजीत जाधव यांनी केंद्र सरकारला केला आहे.
एकता कपूरला यंदा पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं. तिने नेमकं असं कोणतं सामाजिक काम केलं ज्यामुळे तिला हा मानाचा पुरस्कार देण्यात आला??, अशी खंत रणजीत जाधव यांनी व्यक्त केली.
1984 साली खाशाबा जाधव यांचं निधन झालं. यानंतरही तब्बल 17 वर्षांनी त्यांना अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आलं. सरकारदरबारी होत असलेल्या उपेक्षेबद्दल रणजीत जाधव यांनी आपली नाराजी बोलून दाखवली.
दरम्यान, महाराष्ट्रातील खासदारांनी संसदेत अनेकदा खाशाबा जाधव यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा याची मागणी केली. मात्र केंद्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही रणजीत यांनी केला.
ट्रेंडिंग बातम्या-
कोणाच्या अन्नात विष कालवणे हे आमचे संस्कार नाहीत- येवले चहा
मुस्लिमांशी खेळाल तर मोदींना पुन्हा चहा विकावा लागेल- इम्तियाज जलील
महत्वाच्या बातम्या-
सीएए हा काळा कायदा म्हणून इतिहास नोंद करेल- उर्मिला मातोंडकर
मुबारक हो टुकडे टुकडे भाजप– अनुराग कश्यप
कलह पसरवणाऱ्यांना समाजच सरळ करेल- मोहन भागवत
Comments are closed.