बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…अन् मुलाने थेट कानशिलात लगावली; लखनऊ मुलीच्या व्हिडीओनंतर ‘या’ व्हिडीओचा धुमाकूळ

नवी दिल्ली | काही दिवसांपूर्वी लखनऊ मधील एका मुलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओमध्ये मुलीने एका टॅक्सी चालकाला विनाकारण कानशिलात लगावली होती. अशातच आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. मात्र या व्हिडीओमध्ये वेगळं चित्र पहायला मिळतं आहे.

संबंधित व्हिडीओ हा नक्की कुठला आहे, हे अद्याप समोर आलेलं नाही. मात्र या व्हिडीओने सोशल मीडियावर तुफान धुमाकूळ घातला आहे. या व्हिडीओमध्ये तरुण मुलीचं एका मुलासोबत वाद सुरु असल्याचं दिसतंय. यावेळी मुलगी त्याला मारण्याची धमकी देते. तिच्या धमकीला प्रत्युत्तर देत मुलगा देखील मारण्याची भाषा करतो.

दोघांचा वाद सुरु असतानाच मुलगी तरुणाच्या कानशिलात लगावते. आपल्यावर हात उचलेलं सहन न झाल्यानं संबंधित तरुणाने देखील मुलीच्या कानाखाली वाजवली असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसून येतं आहे. यांच्या वादाच्या वेळीस तिथं मोठी गर्दी जमा झाली होती. अनेकांनी हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र सगळ्या मुली बरोबर नसतात, असं तरुणाने म्हणताच मुलीने तरुणाची माफी देखील मागितली.

दरम्यान, या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. या कमेंट बाॅक्समध्ये अनेकांनी लखनऊमध्ये झालेल्या कॅब ड्रायव्हर प्रकरणाचा उल्लेख केला आहे. यावेळी सगळेच तरुण कॅब ड्रायव्हरसारखे सहन करणारे नसतात, असं या कमेंट्समध्ये म्हटलं आहे.

पाहा व्हिडीओः

 

View this post on Instagram

 

A post shared by Addu (@mohdadnan002)

थोडक्यात बातम्या-

तालिबाननं काबूल विमानतळ केलं बंद; नागरिकांची देश सोडण्यासाठी धावाधाव

सिद्धार्थ शुक्ला मृत्यू प्रकरणी सस्पेंस वाढला! झोपेआधी घेतलेल्या गोळ्यांनी केला घात?

पुलावरुन जाताना गाडीने घेतला टर्न अन् झालं भलतच; पाहा व्हिडीओ

“…तर लहान मुलांचं जास्त नुकसान होऊ शकतं”

‘…तर राज्यात पुन्हा लॉकडाऊन लावणार’; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा पुनरूच्चार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More