शरद पवार-अमित शहा भेट खरोखर झाली का?; अमित शहांचं सर्वात मोठं वक्तव्य
नवी दिल्ली | भाजप आणि राष्ट्रवादी पक्षाची अहमदाबादमध्ये गुप्त चर्चा झाल्याचा दावा केला जात आहे. शरद पवार आणि प्रफुल पटेल यांनी अमित शाह यांची अहमदाबादमध्ये भेट घेतल्याचं खळबळजनक वृत्त समोर आलं तेव्हा, ‘सब चीजे सार्वजनिक नही होती’, अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते अमित शहा यांनी दिल्लीत पत्रकारांना सुचक उत्तर दिलं आहे.
अहमदाबादमधील फार्महाऊसवर 26 मार्चच्या रात्री 9.30 वाजता ही भेट झाल्याची माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे प्रफुल पटेलांची भाजपच्या जवळच्या बड्या उद्योजकाशी भेट झाली, त्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही अहमदाबादेतच होते, असं सांगितलं जात होतं. मात्र या बैठकीला पवार उपस्थित होते का, याची पुष्टी झालेली नाही.
शरद पवार आणि प्रफुल पटेल यांची अमित शाह यांच्यासोबत गुप्त चर्चा झाल्याची माहिती ‘दिव्य भास्कर’ या गुजराती वृत्तपत्राने दिली आहे. प्रफुल पटेल आणि शरद पवार प्रायव्हेट जेटने आले होते. त्यानंतर शांतिग्राममधील गेस्टहाऊसला तिघांची भेट झाली, असा दावा या बातमीत करण्यात आला आहे. या भेटीचे परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण, अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंह यांनी टाकलेल्या लेटरबॉम्बनंतर अनिल देशमुख चांगलेच अडकले आहेत. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवरही दबाव वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मात्र ही अफवा असल्याचं सांगत भेटीचं वृत्त नाकारलं आहे. शरद पवार यांनी भाजप नेत्यांची भेट घेण्याचा प्रश्नच येत नाही. भाजपने गुजराती वर्तमानपत्रातून अशा बातम्या पेरल्या आहेत, असा दावा मलिक यांनी केला आहे.
थोडक्यात बातम्या –
संजय राऊतांकडून ‘अपघाती गृहमंत्री’ म्हणून उल्लेख, गृहमंत्र्यांना प्रश्न विचारल्यावर पाहा काय झालं!
शरद पवारांनी अहमदाबादमध्ये जाऊन अमित शहांची भेट घेतली?; राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया
“शरद पवार साहेब कधी कोणाला भेटतील याचा काही नेम नाही”
अजित पवार यांचा खासदार संजय राऊत यांना मोठा इशारा
स्वत:ला ग्रेट दाखवायची धडपड! राष्ट्रवादीच्या आमदाराचं थेट कोरोना रुग्णासोबत फोटोसेशन
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.