बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गाव कन्टेन्मेंट झोन जाहीर, मात्र रेशन दुकानामध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा!

पाथर्डी | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वडगावमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढली. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या रुग्णसंख्येमुळे तहसील प्रशासनाने गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केलं. तालुक्‍यातील वडगाव कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केला असून अनेक लोक कोरोना नियमांचं पालन करताना दिसत नाहीयेत.

वडगावमध्ये अत्यावश्‍यक सेवा वगळता अन्य सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र स्वस्त धान्य दुकान अत्यावश्‍यक सेवेत येत असल्यामुळे गावात धान्यवाटप करण्यात आलं. हे धान्य खरेदी करण्यासाठी अनेकांनी दुकानासमोर प्रचंड गर्दी केल्याचं पहायला मिळालं. यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचं पाहायला मिळालं.

गावातील तरुणांनी याबाबत ग्रामपंचायत प्रशासन, लोकप्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन जबाबदारी झटकली. यानंतर गावामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली तर त्याला स्थानिक प्रशासन जबाबदार राहील, असा आरोप तरुणांनी केला आहे.

दरम्यान, स्थानिक पातळीवर कसलंच नियोजन न केल्यामुळे दुकानांसमोर नागरिकांची गर्दी झाली. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळाला.

थोडक्यात बातम्या- 

विवाहीत प्रियकराकडे प्रेयसीने केली लग्नाची मागणी, प्रियकराने केलं असं काही की…

दिलासादायक बातमी! देशात नव्या कोरोना रुग्णांमध्ये 25 हजारांनी घट, तर कोरोनाबळीही 2800च्या खाली

7 महिन्याच्या बाळाला आईनेच केली जबर मारहाण; कारण अत्यंत धक्कादायक

देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर शरद पवारांनी बोलवली राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्याची बैठक!

‘बॅटिंगवर लक्ष दे, ट्विटरवर नको’ म्हणणाऱ्या नेटकऱ्याला धोनीचं उत्तर; माहीचं 9 वर्षांपूर्वीचं ट्विट व्हायरल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More