बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

माझी नाही तर कोणाचीच नाही म्हणत त्याने तरूणीसोबत केलं धक्कादायक कृत्य!

नवी दिल्ली | भिवंडी येथे एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये एका तरुणाने तरुणीचे चक्क ओठ कापलेत. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. या प्रकरणात तरुणी गंभीर जखमी झाली आहे.

ही घटना शुक्रवारी शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. मुक्तार अब्दुल रहीम अंसारी आणि शाहिद अशी दोन आरोपी तरुणांची नावं आहेत. आरोपी मुक्तार याचे परिसरातील एका तरुणीवर एकतर्फी प्रेम होतं. मुक्तार पीडित तरुणीला मागील एक वर्षापासून त्रास देत होता. मात्र मुलीचा प्रेमाला विरोध होता. या कारणामुळे आरोपीने तिला धमकी देखील होती. तू मेरी नही हुई तो मै तुझे किसी और के लायक नही छोडूंगा, अशी धमकी आरोपीने पीडित तरुणीला दिली होती.

पीडित तरुणी शुक्रवारी सकाळी घराबाहेर पडल्यानंतर मुक्तार आणि त्याचा साथिदार शाहिद यांनी तरुणीला गाठलं. त्यानंतर शाहिदने तरुणीला जबरदस्तीने पकडून ठेवलं. मुक्तारने तरुणीचा नकाब खेचला आणि आपल्या हातातल्या चाकूने तिच्या ओठांवर वार करुन ओठ कापले. यामध्ये मुलीच्या ओठांना गंभीर जखम झाल्याने तिला तातडीने शहरातील स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.

दरम्यान, मुलीची जखम मोठी असल्याने डॉक्टरांनी तिला केईएम रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. सध्या तरुणीवर उपचार सुरु असून घटनेनंतर आरोपी फरार झाले आहेत. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. तसेच आरोपींवर विविध कलमअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

थोडक्यात बातम्या-

“एवढा दरिद्री आहे का महाराष्ट्र माझा?, मुख्यमंत्र्यांंनी जरा विचार करून बोलावं”

इथे मृत्यूही ओशाळला… एका पाठोपाठ एक मृतदेह, विद्युतदाहिन्याची धुरांडी वितळली!

‘मुख्यमंत्र्यांनी जनतेच्या तोंडाला पानं पुसली’; चंद्रकांत पाटलांची ठाकरे सरकारवर टीका

“पवार साहेबांचं सरकार हाय, तुमच्या बापाच्यानं पण पडणार नाय”

रमजानसाठी सरकारकडून मार्गदर्शक सुचना जारी; वाचा काय आहेत निर्बंध

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More